Brahmastra च्या सेलिब्रेशनमध्ये करण जोहर सांगतोय काहीतरी महत्त्वाचं; चाहत्यांना म्हणाला,थोडं थांबा!

मुंबई : दिग्दर्शक करण जोहर सध्या सातव्या आसमानात आहे. एका पाठोपाठ बाॅलिवूड सिनेमांचा बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप शो होत असताना ब्रह्मास्त्र सिनेमानं सुपर डुपर यश मिळवलं. ब्रह्मास्त्र सिनेमाच्या पहिल्या भागाला मोठं ओपनिंग मिळालं. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. बाॅयकाॅट ट्रेंडमध्ये त्यानं प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलं. या आनंदात करण जोहरनं इन्स्टा लाइव्ह केलं. करण सध्या दुबईत आहे.

नव्या मुलाने रंगरुपासहीत स्वत:ची चेटकीण करावी- वैभव मांगले

यशामुळे करण आनंदात
करण जोहरनं आपल्या इन्स्टा लाइव्हमध्ये प्रेक्षकांचे आभार तर मानलेच. शिवाय हेही सांगितलं की लवकरच तो राॅकी और रानी की प्रेमकहानी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करणार आहे. तेही मोठ्या थाटामाटात. करण जोहर येत्या सोमवारी मुंबईत परत येत आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची केमिस्ट्री नेहमीच रंगते. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

ब्रह्मास्त्र सिनेमाच्या यशानंतर आलिया भट्ट एकदा करण जोहरच्या ऑफिसमधून बाहेर पडली. करणच्या ऑफिसमधून आलिया बाहेर पडली ती थेट गाडीत बसूनच. आलियाला पाहून तिथं असलेले फोटोग्रफार्स तिचे फोटो काढण्यासाठी धावले. त्यावेळी त्यांनी आलियाला गाडीतून बाहेर येत फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली. परंतु आलियानं त्या सर्वांची माफी मागितली आणि त्यांना म्हणाली की, ‘मी इथं चालू शकत नाही. त्यामुळे गाडीतून बाहेर येऊ शकत नाही. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.’

स्टेजला केला नमस्कार, उपस्थितांना जोडले हात, रश्मिकाच्या या Videoला चाहत्यांची पसंती

नेटकऱ्यांनी केलं कौतुक
आलिया प्रेग्नंट असल्यानं या काळात होणाऱ्या कंबरदुखी, थकवा अशा सगळ्या गोष्टींना सामोरी जात आहे. त्यामुळेच ती गाडीतून बाहेर उतरली नाही. याबद्दल तिनं तिथं असलेल्या फोटोग्राफर्सची नम्रपणं माफी मागितली. तिच्या हा अंदाज चाहत्यांना आवडला असून त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …