‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत सुदर्शनने कावेरीला किडनॅप केलं आहे. तसेच तिने कंपनीत फ्रॉड केल्याचा देखील आरोप आहे. त्याने सगळीकडे कंपनीत फ्रॉड करून कावेरी पळाली अशी बातमी पसरवली आहे. पोलिसही कावेरीच्या मागावर आहेत. पण राजचा कावेरीवर पूर्ण विश्वास आहे. तिने असं काही केलं नसणार याची त्याला खात्री आहे. तो कावेरीला शोधण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहे. प्रोमोमध्ये कावेरीला जिथे किडनॅप करून ठेवलंय तिथे पोलीस येतात. पोलिसांना पाहून तिला आनंद होतो. ती मला इथून सोडवा अशी मागणी पोलिसांकडे करते.
पोलीस तिला तेथून सोडवतात पण आता तिला फरार आरोपी म्हणून कावेरीला अटक करतात. पोलीस सुद्धा सुदर्शनला सामील आहेत. ते सुदर्शनच्या म्हणण्याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे कावेरी आता चांगलीच संकटात सापडली आहे.
हेही वाचा – Prasad Khandekar : ‘कुर्रर्र नाटकाचा प्रवास माझ्यासाठी बाळाच्या जन्मासारखाच सुंदर होता’; प्रसाद खांडेकरने व्यक्त केल्या भावना
राजला कावेरी कुठे आहे ते कळणार का, या संकटातून राज कावेरीला कसा वाचवणार, तिच्यावरील आरोप सिद्ध होणार का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळतील.
पण राज आणि कावेरी एकमेकांपासून दूर गेल्याने त्यांना एकमेकांवरील प्रेमाची जाणीव झाली आहे. राज कावेरीला खूपच मिस करतोय. त्याने रत्नमालाकडे कावेरीवरील आरोप मागे घेण्याची विनंती केली होती. पण रत्नमालाला देखील आकांक्षाने धमकी दिल्यामुळे ती आरोप मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे नुकत्याच एकत्र आलेल्या रत्नमाला आणि राज मध्ये पुन्हा दुरावा निर्माण झाला आहे. मालिका आता अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या सगळ्यातून राज कावेरीला कसं बाहेर काढतो ते बघण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या