बॉलिवूडची सीक्रेट्स सांगणार करण जोहर? ‘कॉफी विथ करण’मध्ये नव्हे तर नव्या शोची केली घोषणा

मुंबई: कॉफी विथ करण (Koffee With Karan 7) हा शो म्हटलं की सेलिब्रिटी कलाकारांच्या आयुष्यातील रहस्य उघड करणारा शो बनला आहे. आता लवकरच करण एक नवा शो घेऊन येणार आहे ज्यामध्ये अजून कलाकारांची रहस्य उघड होणार आहेत. करणनेच या नव्या शोची घोषणा केली आहे. हा नवा शो डिज्नी प्लस हॉट स्टार या प्लॅटफॉर्मवर येणार असून करणच्या या शोची प्रेक्षकांना उत्सुकता लागली नसेल तरच नवल. इतकच नव्हे तर करणकडून अजून एक सरप्राइज आहे आणि ते म्हणजे कॉफी विथ करण शोच्या ८ व्या सीझनचेही संकेत त्याने दिले आहेत.

हे वाचा-‘सुशांतसिंह राजपूतचे ब्रह्मास्त्र बॉलिवूडचा करेल विनाश…’, SSR च्या बहिणीचा संताप

जुलै महिन्यात करणचा कॉफी विथ करण शोचा सातवा सीझन आला. पहिल्या एपिसोडपासूनच या शोला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे पहिल्या एपिसोडचे गेस्ट होते. त्यानंतर अक्षय कुमार, सामंथा, विकी कौशल, कतरिना कैफ, विजय देवरकोंडा, अनन्या पांडेयांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आता करण एक नवा शो आणणार आहे. बॉलिवूडमधील पडद्यामागच्या अनेक गोष्टी या शोमध्ये उजेडात येणार असल्याने प्रेक्षकांना भरपूर खाद्य मिळेल हे नक्की.


करणचा हा नवा शो ओटीटीवर येणार आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे. अजून या शोबाबत अधिक माहिती करणने उघड केली नाही, पण शो येणार हे मात्र त्याने सांगितलं आहे. सोशल मीडियावर विशेष सक्रिय असणाऱ्या करणने याबाबतची पोस्ट केली आहे. सध्या करण ब्रह्मास्त्र सिनेमाच्या यशाचा आनंद घेत आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाने बॉयकॉटचा ट्रेंड असतानाही पहिल्याच दिवशी ७५ कोटींचा गल्ला जमवला होता.

हे वाचा-ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यानंतरही आलिया भट्टला कसलं टेन्शन? अभिनेत्रीनं शेअर केली पोस्ट

लवकरच करण रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा येणार आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्टची मुख्य भूमिका आहेे. त्याच्या सिनेमापेक्षाही त्याच्या शोकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांना आता कधी एकदा त्याचा शो येतोय असं झालं आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

ही प्रसिद्ध अभिनेत्री बिग बॉसच्या घरात? त्या इन्स्टास्टोरीमुळं चर्चेला उधाण

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची चर्चा सुरू आहे. चौथं पर्व कधी …

मिया खलिफाला Education Advisor बनवण्याची होतेय मागणी; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई, 11 सप्टेंबर- अ‍ॅडल्ट स्टार मिया खलिफा नेहमीच तिच्या फोटो आणि लुकमुळे चर्चेत असते. आता …