‘जरा जरा बेहकता हैं…’ दियाकडे पाहून चाहत्यांच्या मनात पुन्हा गाण्याची रूंजी

दिया मिर्झाचे वय दिवसेंदिवस कमी होत चालले आहे असंच तिच्याकडे पाहून वाटत आहे. दियाने नुकतेच हँडक्राफ्टेड साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा हा लुक चाहत्यांना आवडला असून तिच्या सौंदर्यावर सगळेच फिदा झाले आहेत.

दियाचा हा साडीतील साधेपणा सर्वांनाच भावला आहे. सौंदर्य असावे तर असे. चेहऱ्यावरील निरागसपणा आणि असे सौंदर्य की अप्सराही पडेल फिकी. दियाचा हा साडी लुक नक्की कसा आहे आणि कोणत्या स्टाईलची साडी परिधान केली आहे जाणून घ्या. (फोटो सौजन्य – @diamirzaofficial Instagram)

Sustainable Saree मध्ये दियाचा लुक

sustainable-saree-

दिया नेहमीच पर्यावरणाची काळजी घेण्यात पुढाकार घेते. आता फॅशनमध्येही तिने Sustainable Saree अंगिकारली असून तिचा हँडक्राफ्टेड साडीचा लुक व्हायरल होतोय. या साडीत दिया अत्यंत सुंदर आणि लाघवी दिसत आहे.

रेड, पीच आणि आयव्हरी रंगाची उधळण

रेड, पीच आणि आयव्हरी रंगाची उधळण

दियाने नेसलेल्या साडीत लाल, पीच आणि आयव्हरी या तीन रंगाचे मिश्रण दिसून येत आहे. हे तिन्ही रंग मिसळून तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत. इतकंच नाही तर रोजच्या आयुष्यातील फुलं, स्टार्स, पावसाचे थेंब यापासून प्रेरणा घेत या साडीवर डिझाईन करण्यात आले आहे. Dabu Block Prints असणारी ही साडी लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा :  स्पार्कलिंग बॅकलेस पिंक ड्रेसमध्ये नववधू कियाराचा ग्लॅमरस अवतार, सिद्धार्थ म्हणतोय...

(वाचा – ‘हमको आज ही कल है इंतजार…’ मॉडर्न लुगडं-चोळीमध्ये समृद्धीच्या सौंदर्याने चाहत्यांचा कलिजा खल्लास)

सिल्व्हर दागिन्यांचा साज

सिल्व्हर दागिन्यांचा साज

या साडीसह दियाने सिल्व्हर दागिने घातले असून त्यासह मोती जोडण्यात आले आहे. बारीक नक्षीकाम केलेला नेकलेस आणि डिझाईन्ड कानातले घालून तिने या साडीची स्टाईल पूर्ण केली आहे. तर हे दागिने साडीच्या रंगात अधिक भर घालून शोभा वाढवत आहेत. बांगडी, अंगठी हेदखील घातले आहे.

(वाचा – अभिजात सौंदर्याची खाण आहे सागरिका, नैसर्गिक सौंदर्यावर झहीरच काय दुनिया झालीये ‘क्लीन बोल्ड’! )

वेव्ही मेस्सी बन

वेव्ही मेस्सी बन

या साडी आणि दागिन्यांसह वेव्ही मेस्सी बन तिच्या चेहऱ्याला परफेक्ट लुक मिळवून देत आहे. साडी आणि चेहऱ्याला योग्य अशी हेअरस्टाईल दियाने निवडल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा फॅशनिस्टा असल्याचे दियाने दाखवून दिले आहे.

(वाचा – Daljit Kaur Haldi: नव्या आयुष्याची पुन्हा सुरूवात करतेय दलजीत, निखिल पटेलसह हळदीमध्ये न्हाऊन निघाली)

न्यूड मेकअप लुक

न्यूड मेकअप लुक

या साडीसह जितका नैसर्गिक राहता येईल तितकाच मेकअप दियाने केला आहे. न्यूड मेकअप निवडून केवळ काजळ, लायनर, आयशॅडो, डार्क आयब्रो आणि न्यूड लिपस्टिक शेडचा वापर केला आहे. तर यावर सौंदर्याचा कहर म्हणजे लहानशी लाल टिकली लावत तिने लुक पूर्ण केला आहे.

हेही वाचा :  Hippo Attacks Lion: गेंड्याकडून सिंहांचा पाठलाग अन्...; थरार कॅमेरात कैद! Video ला 36 Lakh Views

वेड लावणारा लुक

वेड लावणारा लुक

दियाचा हा साधा मात्र क्लासी आणि एलिंगट असा वेड लावणारा लुक आहे. दिया नेहमीच कमी मेकअप आणि क्लासी स्टाईलमध्ये दिसून येते. हाच लुक आणि स्टाईल तिने या साडीसहदेखील मेंटेन ठेवली आहे. तिच्या लुकवरून नजर हटत नाहीये.
तुम्हीही एखाद्या कार्यक्रमासाठी दियाचा हा लुक पाहून त्यावरून स्टाईलची प्रेरणा घेऊ शकता. क्लासी आणि उठावदार लुकसाठी ही स्टाईल परफेक्ट आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …