Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाला का म्हटलं जातं मर्यादा पुरुषोत्तम? हे 4 गुण बदलतील संपूर्ण जीवन

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत 22 जानेवारी रोजी 10 प्राण प्रतिष्ठेला सुरुवात होईल. संपूर्ण देशभरात याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अवघा देश ज्या प्रहराची शतकानुशतके वाट पाहत होता तो मंगलमय रामप्रहर निकट आला आहे. रामजन्मभूमीवरील भव्य राममंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनुभूती घेण्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे.

प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा साजरा करताना आपण काही गोष्टी मनात रुजवल्या पाहिजेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या जीवनातील आदर्श आहेत. जे आदर्श आपण सगळ्यांनी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. 

भगवान राम हे विष्णुचे सातवे अवतार आहेत. रामाने रावणाचा संहार करण्यासाठी त्रेता युगात धरतीवर अवतार घेतला. रामाला मर्यादा पुरुषोत्तमाच्या नावाने देखील ओळखलं जातं. मर्यादाचे पालन करताना जगासमोर प्रभू श्रीरामाने आदर्श मांडला. असे कोणते आदर्श आहेत ज्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम झाले आणि हे आदर्श आपण आपल्या जीवनात अंगीकारून सुखी जीवन जगू शकतो. 

आज्ञाधारक मुलगा

राम आज्ञाधारक पुत्र होता. त्यांनी माता कैकेयीची 14 वर्षांच्या वनवासाची इच्छा स्वीकारली. त्यांचे वडील राजा दशरथ यांनी राणी कैकेयीला दिलेल्या वचनात ते अडकले होते. रामाने ‘रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन ना जाय’ याचे पालन केले. राज्याचे त्याग करून 14 वर्षे वनवासात राहिले. 

हेही वाचा :  Ayushi Singh : कोर्टात नेत असतानाच गोळ्या घालून वडिलांची हत्या; 8 वर्षांनी DSP होऊन मुलीने स्वप्न केले पूर्ण

आदर्श भाऊ 

श्रीराम एक आदर्श भाऊ देखील आहेत. रामाने कधीच भाऊ भरतची ईष्या किंवा द्वेष केला नाही. एवढंच नव्हे तर प्रभू श्रीरामाने कायमच भरतबद्दल प्रेम व्यकं केलं. राज्य सांभाळण्यासाठी कायमच प्रेरणा दिली. 

(हे पण वाचा – Ayodhya Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे 8 महत्त्वाचे शिलेदार)

आदर्श पती 

प्रभू श्रीरामाने तिसरा आदर्श गुण पतीच्या रुपात दाखवला. प्रभू राम 14 वर्षांपर्यंत वनवासात वनवासी म्हणून राहिले. ऋषीमुनींची सेवा केली. राक्षसांचा संहार केला. रावणाने जेव्हा पत्नी देवी सीतेचे अपहरण केले तेव्हा प्रभू श्रीरामाने रावणाचा सर्वनाश केला. 

आदर्श राजा 

राम एक आदर्श राजा देखील होते. त्यांनी राजाचे जे आदर्श रुप जगासमोर आणले ते कधीच कुणी विसरु शकत नाही. राम राज्यामुळे कुणालाच कोणताच त्रास होत नव्हता, संपूर्ण प्रजा सुखी आणि आनंदात होती. प्रभू श्रीरामाने कधीच मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. आई-वडिल आणि गुरु यांच्या आज्ञेचे पालन केले. ‘का’ असा पतिप्रश्न कधी केला नाही. प्रभू श्रीरामाचे हे चार गुण आपण स्वीकारु शकतं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …