हिरवीकंच नऊवारी आणि बंधगळा लुक सोनाली – आशयचा राजेशाही थाट

सोनाली कुलकर्णीचे साडीतील लुक्स थक्क करणारे असतात. तर मराठी मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा आशय कुळकर्णीही फॅशनच्या बाबतीत मागे नाही. नुकत्यात पार पडलेल्या म. टा. सन्मान सोहळ्यात या दोघांनीही केलेल्या पारंपरिक लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

सोनाली आणि आशयच्या या लुकची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हिरवीकंच नऊवारी साडी आणि आशयचा गडद मजेंडा रंगातील बंधगळा कुरता अत्यंत आकर्षक दिसत असून या लुकविषयी अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – @sonalee18588 Instagram)

सिल्व्हर बुट्ट्यांची हिरवीगार नऊवारी

सिल्व्हर बुट्ट्यांची हिरवीगार नऊवारी

सोनालीने म. टा. सन्मान सोहळ्यातील आपल्या लुक्सचे काही फोटो आशयसह शेअर केले आहेत. सोनालीच्या या लुक्सवर चाहतेही फिदा झाले आहेत. राजेशाही थाटाप्रमाणे सोनालीच्या नऊवारीचा लुक देण्यात आला आहे. गडद हिरवा रंग आणि त्यासह वेलवेटचा ब्लाऊज अप्रतिम दिसतोय. या साडीवर असणाऱ्या सिल्व्हर बुट्ट्यांनी साडीची शोभाच वाढवली आहे.

बंधगळा जॅकेट आणि कुर्ता

बंधगळा जॅकेट आणि कुर्ता

आशयने मजेंडा रंगातील बंधगळा कुर्ता आणि जॅकेट लुक केला असून त्यावर एका बाजूला गोल्डन पॅच देण्यात आला आहे. आशय या लुकमध्ये Dappler दिसत असून पारंपरिक लुकमुळे एक वेगळाच साज दिसून येतोय.

हेही वाचा :  स्पार्कलिंग बॅकलेस पिंक ड्रेसमध्ये नववधू कियाराचा ग्लॅमरस अवतार, सिद्धार्थ म्हणतोय...

(वाचा – सिल्व्हर सिक्विन ब्रालेट आणि सेफ्टी पिन्स शॉर्ट्समध्ये नोरा फतेहीचा अचंबित करणारा लुक, इंटरनेरवर लावली आग)

नथीचा नखरा आणि कपाळी चंद्रकोर

नथीचा नखरा आणि कपाळी चंद्रकोर

सोनालीने या साडीसह स्टाईल करताना नथ घातली असून हा नथीचा नखरा सौंदर्यात भर घालत आहे तर कपाळावरील चंद्रकोर लक्ष वेधून घेत आहे. यासह तिने आंबाडा बांधला असून कोणत्याही सणासाठी हा लुक परफेक्ट ठरू शकतो. लवकरच येणाऱ्या गुढीपाडव्यासाठीही तुम्ही या लुकवरून प्रेरणा घेऊ शकता.

(वाचा – Jyotika Dilaik Wedding: लाल लेहंग्यात सौंदर्याने न्हाऊन निघाली रूबिना दिलैकची लहान बहीण, ज्योतिकाच्या लग्नाचे फोटो व्हायरल)

कोल्हापुरी चप्पल

कोल्हापुरी चप्पल

आशय आणि सोनालीचे हा पारंपरिक लुक परफेक्ट करताना पायातही कोल्हापुरी चप्पल्स घातल्या आहेत. यामुळे लुक पाहताना अधिक उठावदार आणि मराठमोळा वाटतोय. यासह अगदी पारंपरिक पोझ देत दोघांनी फोटो शेअर केले आहेत.

(वाचा – केसात गजरा, करारी नजर जान्हवी कपूरचा असा लुक की श्रीदेवीचाच भास, ब्लाऊजलेस साडीतील फोटो व्हायरल)

मिनिमल मेकअपने सौंदर्यात भर

मिनिमल मेकअपने सौंदर्यात भर

साधारण अशा सोहळ्यांमध्ये गडद मेकअप करण्यात येतो. मात्र पारंपरिक लुकला प्राधान्य देऊन सोनाली आणि आशयने मिनिमल मेकअप करत लुक पूर्ण केला आहे. काजळ, आयलायनर, बेसिक मेकअप आणि लिपस्टिक यासह सोनालीने नऊवारी साडीचा लुक केलाय तर आशयही या पारंपरिक लुकमध्ये रांगडा गडी दिसतोय.

हेही वाचा :  OMG! जीवघेणे ढेकूण; तुरुंगातील कैद्याला चावा घेवून मारुन टाकले

आता येणारा गुढीपाडवा सण, या सणासाठी वेगळ्या स्टाईलचा विचार करत असाल तर सोनाली आणि आशयची ही स्टाईल तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …