लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग, ज्यातीषांकडून वैवाहिक जीवनाची उत्कंठावर्धक भविष्यवाणी

Kiara Advani and Sidharth Malhotra Wedding : ज्या विवाह सोहळ्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर आनंदाने निर्विघ्नपणे पार पडला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हातात घेत सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका अग्निदेवतेच्या साक्षीने घेतल्या आहेत. राजस्थानमध्ये प्रायव्हेटली काही खास लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपली लग्नगाठ बांधली. जगभरातून दोघांना शुभेच्छांचे संदेश दिले जात आहेत. लग्न हा कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण असतो.

मग जोडपे सामान्य असो वा सेलिब्रिटी कपल असो. पण सेलिब्रिटी कपल्सचे लग्न म्हटले की ते कितपत टिकेल याची सर्वाधिक चर्चा होते. कारण अहो इतिहासच तसा आहे. फार कमी सेलिब्रिटी कपल्स असे आहेत ज्यांना आपले लग्न टिकवता आले आहे. मग कियारा आणि सिद्धार्थच काय? त्यांचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? ज्योतिष नवीन खंतवाल यांनी कियारा आणि सिद्धार्थ यांची रास आणि जन्मांक यांचा आधार घेऊन काही रोचक गोष्टी सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम@sidmalhotra, योगेन शाह, Twitter – Piyu, Alia, Abhishek Lohia (अभिषेक लोहिया), rediff movies, NDTV)

हेही वाचा :  Kiara Advani Siddharth अडकणार लग्नबेडीत,पेस्टल नव्हे मनिष मल्होत्राच्या लाल लेहंग्यात दिसणार नवरीबाईची सुंदरता

याबाबतीत अगदी सेम आहे सिद्धार्थ आणि कियारा

याबाबतीत अगदी सेम आहे सिद्धार्थ आणि कियारा

नावानुसार सिद्धार्थची राशी कुंभ आणि कियाराची मिथुन आहे. या दोन्ही राशी वायु तत्वाच्या आहेत, त्यामुळे या दोन्ही राशी काही बाबतीत अगदी सारख्याच असतील. उदाहरणार्थ, रिलेशनशिपमध्ये असतानाही हे दोघे एकमेकांना पर्सनल स्पेस देतील. ते एकमेकांच्या मतांचा पूर्ण आदर करतील. हे दोघे कधीही एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आयडियल कपल्स सारखे दोघे एकमेकांना समजून घेतील असेच या अनुमानावरून दिसते आहे.

(वाचा :- Propose Day 2023 : प्रपोज हे गुडघ्यावर बसूनच का केलं जातं, कारण ऐकल्यावर डोकं अक्षरश: हलेल, विसराल इतर पद्धती)​

कधी वाद झाले तर

कधी वाद झाले तर

कुंभ राशीच्या लोकांची वैचारिक क्षमता चांगली असते, तर मिथुन राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती चांगली असते. म्हणजेच, सिद्धार्थची विचारप्रक्रिया चांगली आहे, तसेच कियाराची कल्पनाशक्ती आहे, ज्यामुळे दोघेही एकत्र काहीतरी नवीन करू शकतात. मिथुन आणि कुंभ राशीमध्ये चांगले मानसिक संबंध देखील दिसून येतात. त्यामुळे कियारा आणि सिद्धार्थ यांच्यात वादाची परिस्थिती असली तरी दोघेही एकमेकांशी एकनिष्ठ राहतील. या दोन राशीच्या लोकांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण होण्यासाठी थोडा वेळ लागतो, याचा अर्थ दोघांना आणखी काही वेळ एकत्र घालवावा लागेल.

(वाचा :- Rose Day: चुकूनही देऊ नका बायको व गर्लफ्रेंडला एकाच रंगाचं गुलाब, वाचा प्रत्येक रंगाचा अर्थ मग करा निवड नाहीतर)

हेही वाचा :  झोका खेळताना जीव गमावला, एका चुकीने दहा वर्षांच्या चिमुकल्याला बसला गळफास, नाशिकची घटना

अंकज्योतिषनुसार अशी आहे जोडी

अंकज्योतिषनुसार अशी आहे जोडी

अंकशास्त्रानुसार कियाराची मुळ अंक 4 आहे आणि सिद्धार्थचा मुळ अकं 7 आहे. अंकशास्त्रानुसार या दोन अंकांना चांगले पार्टनर मानले जाते. त्यांच्या नात्यात उत्स्फूर्तता, सहजता आणि आनंद दिसून येतो. म्हणजेच कियारा आणि सिद्धार्थचे वैवाहिक आयुष्य खूप चांगले जाणार आहे. शिवाय दोघेही स्वभावाने खूप जास्त समजूतदार असल्याने त्यांच्यात वादाची स्थिती निर्माण होणार नाही असेच सर्वजण म्हणत आहेत.

(वाचा :- लग्न नाही प्रेमावर विश्वास ठेवला अन् श्रद्धाच्या शरीराचे झाले 35 तुकडे, प्रेमात बुडालेल्यांनो जागे व्हा कारण..)​

काय म्हणते कुंडली?

काय म्हणते कुंडली?

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या कुंडलीचा आधार घेतला तर कियारा ही सिंह आणि सिद्धार्थ हा वृश्चिक राशीचा आहे. या राशींचे स्वामी मंगळ आणि सूर्य एकमेकांचे मित्र आहेत. सिंह हे अग्नि तत्वाचे चिन्ह आहे आणि वृश्चिक हे जल अर्थात पाणी तत्वाचे प्रतिक आहे. जर या दोन्ही राशींचे एकमेकांवर प्रेम असेल तर काही गोष्टींबाबत त्यांच्यात मतभेद आहेत. तथापि, या राशीचे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि ते आपापसातील मतभेद दूर करण्यास सक्षम असतात. या दोन्ही राशीच्या लोकांना जास्त राग येतो आणि ते हट्टी देखील असतात. यामुळे या सेलिब्रिटी कपलला नात्यासाठी काही तडजोड करावी लागू शकते. तथापि, जर या सर्वांचा सारांश काढला तर, हे स्पष्ट आहे की कियारा आणि सिद्धार्थचे वैवाहिक जीवन चांगले असेल.

हेही वाचा :  Kiara Advani Siddharth गोल्डन पर्स, पिंक शाल घेऊन नवराईची लग्नघाई, कियाराच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो लपवता लपला नाही

(वाचा :- आमिर खान, सामंथा, मानसी नाईक मोठमोठ्या कलाकारांचे लग्न ठरले फेल, यातून धडा घेऊन या 5 चुकांकडे करू नका दुर्लक्ष)​

ज्योतिष हा केवळ आधार आहे

ज्योतिष हा केवळ आधार आहे

आपल्या संस्कृतीत फार पूर्वीपासून ज्योतिष शास्त्र हे महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे भविष्यात काय होणार त्याचा अंदाज ज्योतिष शास्त्रानुसार लावता येतो असे म्हणतात. इतकंच काय पत्रिका पाहिल्याशिवाय कोणंतच लग्न पार पडत नाही. असे असले तरी वैवाहिक आयुष्यात एकमेकांना समजून घेण्याची क्षमताच सुखी आणि यशस्वी वैवाहिक आयुष्याची किल्ली आहे हे लक्षात घ्यायला हवे. कारण वैवाहिक आयुष्य हे दोघांचे असते आणि त्याचे भविष्य देखील दोघांच्याच हातात असते.

(वाचा :- फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …