माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे पण आई वडिलांचं मन दुखावू नये म्हणून लग्न करतोय दुसऱ्याच मुलीशी, कशी हाताळू परिस्थिती

आजही आपल्याकडे भारतामध्ये आई – वडीलच बरेचदा मुलांच्या लग्नाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना दिसतात. आपल्या मुलांच्या मनाचा नाही तर स्वतःच्या प्रतिष्ठा आणि परंपरेचा विचार करून स्वतःच मुलगा अथवा मुलीचे लग्न ठरवून मोकळे होतात. पण या परिस्थितीत त्या मुलाचा वा मुलीचा नक्की काय कोंडमारा होतो याबाबत विचारही केला जात नाही. अशा परिस्थितीत फसलेल्या एका मुलाची कहाणी. मात्र या परिस्थितीत नक्की काय करायला हवे हे आम्ही मानसोपचारतज्ज्ञ प्रज्ञा म्हसळे यांना विचारले आणि त्यांनी यामधून मार्ग दाखवला आहे. (फोटो क्रेडिटः Freepik.com)

काय आहे मुलाची मनस्थिती

आई-वडिलांनी मुलाचे एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे हे माहीत असूनही लग्न ठरवले. मात्र त्या मुलाची सध्या चलबिचल सुरू आहे. ही परिस्थिती अनेकांवर उद्भवते. चित्रपटात सर्व काही गोड शेवट होताना दाखवला जातो. मात्र खऱ्या आयुष्यात ही परिस्थिती खूपच बिकट असते. आई – वडिलांच्या प्रतिष्ठेचा ताण, त्यात आपण ज्या मुलीवर प्रेम करत आहोत, तिच्यासह जगायची स्वप्नं पाहत आहोत त्या मुलीच्या मनाचा विचार न करता दुसऱ्या मुलीशी लग्न करावं लागणार आहे याचा ताण, तर तिसरीकडे ज्या मुलीशी लग्न करणार आहोत तिचं आयुष्य तर उद्धस्त होणार नाही ना आणि तिची स्वप्नं आपल्यामुळे धुळीला तर मिळणार नाहीत ना याचा ताण. या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं? या सगळ्यात मुलाचा कोंडमारा जन्मभर राहणार असतो.

हेही वाचा :  Strike in Maharashtra : जुन्या पेन्शनसाठी 18 लाख कर्मचारी संपावर, सरकारी कार्यालये ओस

काय होतो परिणाम

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मन हे नेहमीच द्विधा मनस्थितीत राहणार यात शंका नाही. कारण ज्या आई – वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठे केले त्यांना दुखावणे हे आपल्याला पटत नाही. पण ज्या मुलीवर आपण प्रेम करतो तिला सोडणंही शक्य नसतं. पण या परिस्थितीतून मार्ग काढायलाच हवा. त्रिशंकू परिस्थिती ठेऊन निर्णय घेणं हे सर्वांसाठी धोकादायक ठरू शकतं.

(वाचा – नीता अंबानी आणि टीना दोन्ही जावांमध्ये आहे मैत्रीचं नातं, कशा जपतात स्पेशल बाँड)

काय आहे मध्यमार्ग

आई आणि वडिलांना बसवून त्यांना समजावून देण्याचा १०० टक्के प्रयत्न करावा. आपण जी मुलगी निवडली आहे ती नक्कीच आपल्यासाठी आणि आपल्या घराण्याला एकत्र जोडून ठेऊ शकते हे पटवून देण्याचा प्रयत्न करावा. प्रतिष्ठा – परंपरा यापेक्षाही मन आणि पुढील आयुष्य एकत्र घालवणे महत्त्वाचे आहे हे पटवणे अत्यंत गरजेचे आहे.

(वाचा – अशी सुरु झाली केएल राहुल आणि अथिया शेट्टीची फिल्मी लव्हस्टोरी,सुनील शेट्टीनेही बजावली महत्त्वाची भूमिका)

मुलीशी संपर्क पूर्ण तोडणे

जर आई – वडिलांचे म्हणणे मान्य केले असेल तर तुम्ही प्रेम करत असलेल्या मुलीशी संपूर्ण संपर्क तोडावा. हे करणं सोपं नाही. मात्र जर तुम्हाला एखाद्या नात्यात राहायचे असेल तर १०० टक्के त्या नात्याला न्याय देण्याची गरज आहे. अन्यथा तुम्ही दोन्ही मुलींची फसवणूक तर करालच पण आयुष्यभर स्वतःच्या मनाची फसवणूक केल्यामुळे व्यवस्थित आयुष्य जगू शकणार नाही.

हेही वाचा :  एकच नंबर ! फोनच्या मदतीने माहित करा उंची, पाहा कसे वापरायचे हे फीचर ?

(वाचा – एका कमेंटवरून सुरू झाली राहुल वैद्य आणि दिशा परमारची Love Story, नॅशनल टीव्हीवर प्रपोज करून जिंकले मन)

होणाऱ्या बायकोला पूर्वकल्पना देणे

लग्नानंतर कोणत्याही गोष्टी कळून दुखावण्यापेक्षा होणाऱ्या बायकोला विश्वासात घेऊन या सर्व प्रकरणाची पूर्वकल्पना देणे योग्य ठरेल. जेणेकरून तुमची लग्न मोडण्याची इच्छा आणि धमक नसेल तर कदाचित ती हे पाऊल उचलेल आणि तुमच्या दोघांचेही भवितव्य सुखरूप राहील. पण हे लग्न होण्याच्या आधीच करावे. कारण लग्नानंतर नात्याचा बेसच बसला नाही तर संपूर्ण आयुष्य एकत्र काढणं कठीण होईल.

नातं हे मुळातच नाजूक असतं आणि त्यातही नवरा आणि बायकोचं नातं हे खूपच भावनिक, संवेदनशील आणि नाजूक असतं. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी दोन्ही बाजूने व्यवस्थित विचार करूनच तुम्ही पाऊल उचलावं हे योग्य राहील.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Bharti: तुम्ही पदवीधर आहात? तुमचं बीई किंवा बीबीए झालंय आणि तुम्ही नोकरी शोधताय? तर …

INDIA Alliance : ‘आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण…’ उद्धव ठाकरेंचा घणाघात

INDIA Alliance Press Conference : राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आज लोकसभेच्या …