हनी सिंगला झालेला मेंदूचा गंभीर आजार, उपचारासाठी लागले तब्बल 7 डॉक्टर्स, ही होती भयंकर लक्षणं

Yo Yo Honey Singh’s Mental Illness : ‘Yo Yo Honey Singh… ‘ हे ते नाव आहे ज्याने रॅप म्युझिकमध्ये रिव्होल्यूशन घडवून आणले. त्याने खऱ्या अर्थाने तरुणाईला रॅप म्युझिकची गोडी लावली आणि आजही त्याची गाणी तितकीच आवडीने ऐकली जातात हे विशेष! तर अशा ह्या जबरदस्त गायक आणि संगीतकाराने Shahrukh Khan, Akshay Kumar, Amitabh Bachchan यांसारख्या सुपरस्टारच्या चित्रपटात सुद्धा आपल्या गाण्यांचा डंका वाजवला. करियरच्या पिक पॉईंटला असतानाच एक दिवस अचानक त्याचे नशीबच फिरले आणि आणि सगळंच चुकलं. इतरांना प्रेरणा देणारा हनी सिंग स्वत: मात्र मनातून खचला होता.

तो मानसिक विकारांच्या चक्रात अडकला. पण आता तो त्यातून बाहेर पडला असून काहीच दिवसांत त्याची स्वत:ची जर्नी दाखवणारी डॉक्यूमेंटरी सुद्धा रिलीज होणार आहे. जिंकलेल्या मग यशाच्या शिडीवरून झाली कोसळलेल्या आणि आता पुन्हा राखेतून भरारी घेणाऱ्या प्रतिभावंत हनी सिंगने 15 मार्च रोजी वयाची चाळीशी पूर्ण केली. मागे एका मुलाखतीमध्ये बोलताना हनी सिंगने सांगितले की त्याला बाइपोलर डिसऑर्डर/साइकोटिक सिम्पटम्स (Bipolar Disorder/Psychotic Symptoms) आजार झाला होता. आता तो त्यातून बाहेर पडला असला तरी या आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य :- iStock, Instagram/yoyohoneysingh)

हेही वाचा :  रोज टोमणे, मार आयुष्य अगदी नरक झाले होते..या 4 महिलांनी सांगितल्या आयुष्यातील थरारक कहाण्या

बाइपोलर डिसऑर्डर हा आजार आहे खूप घातक

बाइपोलर डिसऑर्डर हा आजार आहे खूप घातक

अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशननुसार, बाइपोलर डिसऑर्ड हा मेंदूचा एक विकार आहे. ज्यामध्ये रुग्णाचा मूड, एनर्जी, काम करण्याची पद्धत आणि वागणूक खूप वेगाने बदलते. हा बदल काही तास टिकतो. या विकारामध्ये बाइपोलर I, बाइपोलर II आणि साइक्लोथाइमिक डिसऑर्डर यांचा समावेश होतो.

(वाचा :- 24 वर्षीय शिंवागी जोशीला Kidney Infection, दिसली ही 8 लक्षणं, अभिनेत्रीचा हा सल्ला खूप महत्त्वाचा आणि इशा-याचा)​

बायपोलरची मानसिक लक्षणे

बायपोलरची मानसिक लक्षणे

हेल्थलाइनच्या मते, सायकोसिस हा विकार नसून ते विकाराचे लक्षण आहे. ज्याची सुरुवात होते तेव्हा काम करण्याची क्षमता कमी होते, लक्ष केंद्रित करता येत नाही, सामाजिकदृष्ट्या मिसळणे कठीण होऊन बसते, भावनिकरित्या व्यक्ती अधिक संवेदनशील होतो, अनियंत्रित विचार मनात येऊ लागतात आणि जागरूकता कमी होते.

(वाचा :- Weight Loss Cancer या पद्धतीने वेटलॉस करणं खूप लाभदायक व सुरक्षित, नाहीतर ब्लड सेल्समध्ये कॅन्सर बनवतो लठ्ठपणा)​

हेही वाचा :  '..हाच सरकारचा प्रॉब्लेम', जरांगेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'मराठ्यांनी स्वत:च्या लेकरावर अन्याय झाला तरी..'

हनी सिंगला का झाला हा विकार?

हनी सिंगला का झाला हा विकार?

3 जानेवारी 2023 रोजी सिद्धार्थ आलमबयानला दिलेल्या मुलाखतीत, रॅपर हनी सिंगने सांगितले की त्याच्या आजारामागे 4 मुख्य कारणे आहेत. खुप जास्त मद्यपान करणे, झोप न मिळणे, वर्कहोलिक असणे आणि नशा आणणाऱ्या पदार्थांचे अधिकाधिक सेवन करणे होय. ह्या चार गोष्टी हनी सिंगचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या ठरल्या आणि तो बाइपोलर डिसऑर्डरला बळी पडला.
(वाचा :- 95% ब्लॉकेजेसमुळे आला हार्ट अटॅक, सुष्मिता सेनच्या Cardiologist चे हे 5 उपाय नैसर्गिकरित्या टाळतात जीवाचा धोका)​

7 डॉक्टरांनी 5 वर्षे केले उपचार

7-5-

बायपोलर डिसऑर्डर / सायकोटिक लक्षणांच्या उपचारांबाबत, हनी सिंगने सांगितले की त्याला 7 डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. काहींनी तर तो यातून कधीच बाहेर पडणार नाही असे सांगितले होते. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत हनी सिंगने सांगितले की, यातून बाहेर पडण्यासाठी त्याला 5 वर्षे लागली आणि ड्रग्सच्या प्रभावामुळे तो खूप लठ्ठही झाला होता.
(वाचा :- सावधान, XBB 1.16 च्या रूपात पुन्हा आला कोरोना,महाराष्ट्र-गुजरातमध्ये 754 लोक आजारी, 9 लक्षणांवर ठेवा बारीक नजर)​

नैराश्य आणि चिंतामुक्त होण्यासाठी वापर या टिप्स

नैराश्य आणि चिंतामुक्त होण्यासाठी वापर या टिप्स

हनी सिंगने पुणे टाइम्स मिररला दिलेल्या मुलाखतीत तणाव, चिंता आणि नैराश्यावर मात करण्यासाठी काही टिप्स दिल्या. जसे की अशा वाईट स्थितीत अडकल्यावर वा विकाराची लक्षणे दिसू लागल्यावर ही गोष्ट कोणाशी तरी शेअर करा. जवळच्या व्यक्ती नेहमी अशा स्थितीत पाठीशी उभ्या राहतात. या स्थितीत कोणतेही व्यसन सहन लागू शकते पण व्यसनाच्या आहारी न जाणे हा मोलाचा सल्ला हनी सिंगने दिला.
(वाचा :- Anti Aging: वयाच्या 60 नंतरही येणार नाही म्हातारपण, कायम दिसाल अनिल कपूरसारखे तरूण-फिट, खायला घ्या हे 5 पदार्थ)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  शेवटच्या टप्प्यातील यकृताचा आजार, लक्षणे आणि परिणाम नक्की काय आहेत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …