Women’s Day साठी महिलांना मोठं गिफ्ट, बसमधून मोफत प्रवासाची संधी, जाणून घ्या कुठे?

Happy International Women’s Day 2023: दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन (International Women’s Day 2023) अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस म्हणून साजरा करतात. याचपार्श्वभूमीवर मीरा भाईंदर-म्युनिसिपल कॉर्पोरेशन (MBMC) च्या सार्वजनिक वाहतूक युनिटने महिला दिनानिमित्त महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. 

विविध कामानिमित्त शहरात आलेल्या महिला नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी म्हणून शहर बसमध्ये बसल्या आणि आज तिकीट काढावे लागणार नाही व मोफत प्रवास करता येणार असल्याचा सुखद धक्का त्यांना बसणार आहे. जागतिक महिलादिनानिमित्त MBMC च्या सार्वजनिक वाहतूक युनिटने महिलांना मोफत प्रवासाची (Free Rides) ऑफर दिली आहे. शहरातील सर्वच मार्गांवरून जाणाऱ्या बससाठी ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान कोरोना (Covid 19) काळाता 2021 मध्ये फक्त 11,552 महिला प्रवासी निर्बंधांह मोफत प्रवासाचा आनंद घेऊ शकल्या. मात्र त्याच तुलनेत गेल्यावर्षी यामध्ये वाढ होऊन ही संख्या 21,461 प्रवासी संख्या झाली होती. या उपक्रमासाठी 2021-22 मध्ये नागरी संस्थेला 1,43,995 ते 2,73,786 रुपये खर्च आला होता. हा महिलांच्या कौतुकासाठी छोटासा उपक्रम आहे, सर्व मार्गांवर चालणाऱ्या बसेस या दिवशी महिलांसाठी मोफत बस सेवा असतील, अशी माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे… 

हेही वाचा :  Women`s day : महिला दिनी एका प्रश्नाचं उत्तर द्या; जागतिक पुरुष दिन कधी असतो माहितीये ?

वाचा: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आज काय आहे दिल्ली ते मुंबईमध्ये तेलाचे दर 

तसेच सध्या नागरी प्रशासनाकडे 74 बसेस असून यामध्ये 59 नियमित बसेस, 5 एसी व्हॉल्वो आणि 10 मिडी आहेत. बाहेरील 18 मार्गांवर सत्तर गाड्या आहेत. मीरा-भाईंदर महानगपालिका परिवहवन बस सेवा हळूहळू शहराबाहेरील अधिक भागांमध्ये पोहोचत आहे. त्यामुळे एकाच दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 90 हजारांवर पोहोचली आहे. तसेच ही सेवा प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याचा विचार नागरी संस्था करत आहे. 

8 मार्चला का महिला दिन साजरा करतात?

8 मार्चचा संबंध रशियाशी आहे. या ठिकाणी 1917 साली क्रांतीला सुरुवात झाली. एकत्र जेवण्याची मूभा आणि मताधिकाराच्या मुद्द्यावरुन रशियामध्ये महिलांनी मोठं आंदोलन सुरु केलं. या वेळेस रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडरचा वापर केला जायचा. तर इतर देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर केला जायचा. म्हणजेच रशियाच्या तत्कालीन कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारीची तारीख जगाच्या दृष्टीने 8 मार्चची तारीख होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …