Ajit Pawar : पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला, राज्य सरकारला नुकसानीचा अंदाजच नाही – अजित पवार

 Ajit Pawar  on Loss of farmers : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. ( Farmers Loss ) त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलीय. विरोधी पक्षांनी आज स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी केलीय. (Farmers in Maharashtra suffer from unseasonal rains) काल धुळवडीत नेते सहभागी असल्यामुळे सरकारला अजून नुकसानीचा अंदाज आला नसावा असा टोला त्यांनी मारला. ( Ajit Pawar  on Loss of farmers due to unseasonal rains

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक मदतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या आठवड्यात कांद्या प्रश्नावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते.

अजित पवार म्हणाले, एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारले? परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याच शेतकऱ्यांनी सांगितले आहे. 6 तारखेपासून 9 तारखेपर्यंत हवामान बदलल जाईल, असं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार घडलं देखील. मात्र, सरकारला याचा अंदाज नसल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :  Stocks निवडताना चूका होतायत; काय काळजी घ्याल?

आपण चालू अर्थसंकल्प अधिवेशानत अवकाळी पावसाचा मुद्दा मांडणार आहोत. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अवकाळी पावसामुळे झालं आहे. हवामान खात्याने  हवामान बदलाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अजूनही दोन दिवस पाऊस झाला तर आणखी नुकसान होऊ शकते. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत, अशी माहिती   अजित पवार यांनी यावेळी दिली.

आंबा, हरभरा, गहू मका द्राक्ष, कांदा यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मी अहमदनगर जिल्ह्यात देखील हे सगळं पाहिलं आहे. होळीचा सण आहे. रंगाची उधळ होत आहे. आम्ही समजू शकतो. सण आहे. पण सरकारही रंगात होळी साजरी करत ्सताना दिसले. मात्र, असे असले तरी पावसाने किती मोठे शेतकऱ्याचे नुकसान झाले याचा त्यांना अंदाज आलेला नाही,असेच दिसून येत नाही. त्यामुळे ते शांतच आहेत. आम्ही शेतकरी नुकसानाचा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असे ते म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …