WhatsApp Chat : आता व्हॉट्सॲपचे प्रायव्हेट चॅट होणार एकदम लॉक, फोनचा पासवर्ड मिळाला तरी चॅट राहणार सेफ

नवी दिल्ली :WhatsApp Chat Lock : व्हॉट्सॲप हे आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे ॲप झाले असून साध्या चॅटिंगपासून ते महत्त्वाचे ऑफिसरिलटेड चॅट्सही व्हॉट्सॲपवर होत असतात. त्यामुळे व्हॉट्सॲपचे चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी आपल सारेच कायम प्रयत्न करत असतो. दरम्यान आता तुमच्या मोबाईलचा पासवर्ड एखाद्याला माहीत असेल तरी तुमचे व्हॉट्सॲपवरचे चॅट सुरक्षित राहणार आहेत. कारण व्हॉट्सॲपने एक नवीन गोपनीय फिचर आणलं आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर असलेले मेसेज लॉक करून ठेवू शकता. या नव्या फिचरचे नाव Chat Lock असे आहे. विशेष म्हणजे केवळ वैयक्तिकच नाही तर ग्रुप चॅट साठी सुद्धा लॉकचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे चॅट तुम्ही एखाद्या फोल्डर मध्ये save करू शकता.या नव्या फिचरमुळे तुम्हाला आलेले मेसेज इतर कुणीही वाचू शकणार नाही. व्हॉट्सॲपवर मेसेज आल्यानंतर नोटिफिकेशन मुळे मेसेज करणाऱ्याचे नाव आणि मेसेज इतर कुणीही वाचू शकत होते. पण आता chat लॉक फिचर मुळे तुमचे चॅट सुरक्षित असणार आहे. हे फिचर अँड्रॉइडसह आयओएस फोनमध्ये वापरू शकणार आहेत.

Chat Lock फिचर वापरायचे कसे ते पाहूया…

हेही वाचा :  WhatsApp घेऊन येत आहे तीन नवे फीचर्स, आता चॅटिंग होणार आणखी सेफ

1. हे फिचर वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲपचे लेटेस्ट version अपडेट करावे लागेल.

2. त्यानंतर तुम्हाला जे चॅट लॉक करायचे आहे त्यावर टॅप करा.

3. व्हॉट्सॲपवरचा जे group चॅट किंवा कॉन्टॅक्ट लॉक करायचे आहे त्यातील चॅट info सेक्शन मध्ये जा.

4. इथे तुम्हाला chat lock हे फिचर सुरू करण्यासाठी एनेबल या option वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचे चॅट लॉक होईल

5. आता तुम्हाला हे चॅट वाचण्यासाठी face id किंवा फिंगर प्रिंट वापरावे लागेल. त्यानंतरच हे चॅट मेसेज तुम्ही तुमच्या सोयीनुसार वाचू शकता.

कसे पाहाल Chat Lock?

1. सगळ्यात आधी व्हॉट्सॲप open करा.
2. त्यानंतर Swipe down करून Locked चॅट फोल्डर वर क्लिक करा.
3.त्यानंतर तुम्ही ज्याप्रकारे लॉक केलं आहे तसंच ओपन करा म्हणजे फिंगरप्रिंट किंवा पॅटर्न टाकून चॅट ओपन करु शकता.

वाचा : २०२३ मध्ये तंत्रज्ञानाच्या जगतात होणार मोठे बदल, ‘या’ १० टेक्नॉलॉजीस येणार ट्रेंडमध्ये

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीच्याच अवतीभोवती …

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …