रोज टोमणे, मार आयुष्य अगदी नरक झाले होते..या 4 महिलांनी सांगितल्या आयुष्यातील थरारक कहाण्या

विवाहित नातेसंबंधाचा पाया पूर्णपणे विश्वासावर अवलंबून असतात. जेव्हा एखाद्या नात्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी मिळतात तेव्हा आपण एकत्र राहणाचे वचन एकमेकांना देतो. पण नात्यात जेव्हा या गोष्टी कमी असतात तेव्हा मात्र असे नाते अधीक काळ टिकत नाही. तेव्हा लोक प्रेम शोधण्यासाठी किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतर लोकांकडे वळतात. परंतु महिल्यांच्या बाबतीत मात्र असं म्हणतात की महिला नातं जपण्यासाठी खूप कष्ट घेतात पण जेव्हा गोष्टी त्यांच्या हातातून निघून जातात तेव्हा त्या आयुष्यात पुढे जातात.यासाठीच आपल्या पैकीच काही माहिलांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. नात्यात असणाऱ्या कमतरतेमुळे त्यांनी हा मार्ग निवडला. त्यांच्या या कहाण्या ऐकून तुमचा देखील थरकाप उडेल. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंंडिया)

​कमी वयात झाले लग्न

एका महिलेने सांगितले की, माझे लग्न वयाच्या २४ वर्षी झाले पण या काळात माझा नवरा अजिबात रोमँटिक नव्हता. त्याला माझ्याबद्दल विशेष आपुलकी नव्हती. एक पत्नी म्हणून मला जेवढे काही करता येत होत तेवढं सर्व मी केलं. मुलांच्या संगोपनामध्ये माझे संपूर्ण आयुष्य खर्च केले. पण त्याने माझे कधीही कौतुक केले नाही तर ते मला नेहमी घालून पाडून बोलत असे. अशात मला दुसऱ्या व्यक्तीसोबत आनंद मिळू लागला. त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण अप्रतिम होता. त्यादरम्यान मला जाणवले की या अर्थहीन लग्नात मी आयुष्य जगाचे विसरले होते. त्या व्यक्तीचे माझ्या आयुष्यात येणं म्हणजे माझ्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडण्यासारखे होते. (वाचा :- विक्रम गोखलेंचा ‘या’ बेस्टफ्रेंडने दिली त्यांना आयुष्यभर साथ, नात्यांना जपण्याची कला शिकण्यासारखी)

हेही वाचा :  खूप प्रेम करुनही नात्यात फक्त आरोप, एकटेपणा आणि केवळ पश्चाताप...

​प्रेमाचा अभाव

माझा नवरा फक्त त्याच्या आईवडिलांची काळजी करतो. त्याच्या आयुष्यात माझी कोणतीही भूमिका नाही असे दिसते. जरी, मी असे म्हणत नाही की त्याने त्याच्या पालकांवर प्रेम करणे थांबवावे, परंतु कधीकधी ते माझ्यासाठी खूप जास्त होते. तो कधीच माझी काळजी घेत नाही. तसेच कोणीही मला खूश करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून जेव्हा कोणी माझ्यामध्ये स्वारस्य दाखवले तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे त्याच्यासाठी समर्पित केले. पण एवढं सर्व झाल्यानंतर मी दुसऱ्या व्यक्तीमध्ये माझ्या भावना आणि वेळ दाखवला. (वाचा :- या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, Sudha Murthy यांनी दिला गुरुमंत्र)

​टिका आणि फक्त मार

एक माहिला सांगते की माझे पती कथाकार आहेत. पण या व्यक्तीने माझ्या आयुष्याच्या काहाणीतील सर्वच रंग उडवून टाकले. ते माझ्यावर टीका करत मला खूप टोमणे मारतात तर कधी मार ही मिळतो. यासर्वमुळे मला या लग्नात राहणं कठीण होऊन बसलं आहे. मला हे नाते संपवायचे आहे. पण अडचण अशी आहे की मी त्याला घटस्फोट देऊ शकत नाही. कारण आमच्या कुटुंबांमध्ये चांगले संबंध आहेत. त्यामुळेच मला माझा आनंद इतरत्र शोधावा लागला. (वाचा :- एकमेकांना गर्विष्ठ समजायचे, बरेच दिवस अजिबात बोलले नाही, चित्रपटापेक्षा कमी नाही बुमराह आणि संजनाची लव्ह स्टोरी)

हेही वाचा :  माझी कहाणी: माझ्या आयुष्यात दोन स्त्रिया आहेत माझं दोघींवरही समान प्रेम आहे, मी कोणला निवडू

​नाते बोरींग झाले होते

माझे पतीसोबतचे नाते खूप कंटाळवाणे झाले होते. आम्ही कामानंतर एकत्र टीव्ही पाहायचो. आम्ही दोघेही कधी बाहेर गेलो नाही. खरे सांगायचे तर, आमच्या नात्यात काहीच राहिला नव्हतं या संदर्भात मी पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण काही फरक पडला नाही. (वाचा :- Living Happy Married Life: या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, सुधा मूर्ती यांनी दिला गुरुमंत्र)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …