सिनेमाच्या शूटिंगमध्ये काही कलाकार लंडनमधलेही आहेत. अशाच एका सहकलाकाराबरोबर संकर्षणनं फोटो शेअर केला आहे. तो लिहितो, ‘लंडनमधला सहकलाकार. मूळचा पोर्तुगीजचा. मग अमेरिकेत राहिलेला आणि आता इथे लंडनला. महाअवलिया. ऊंगलीबाज आणि मस्त नट. म्हणूनच जुळलंय आमचं.’ लंडनहून संकर्षणनं फारशा पोस्ट शेअर केल्या नव्हत्या.
पहिल्यांदाच घडलं असं काही! कोणत्याही संघाने जिंकला नाही ‘पुरुषोत्तम करंडक’
लंडनला शूटिंग सुरू असलेला सिनेमा ऋषिकेश जोशी दिग्दर्शित करत आहे. तर संकर्षणबरोबर प्राजक्ता माळी, वैभव तत्त्ववादी, आलोक राजवाडे यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचं नाव अजून कळलं नाहीय.
हल्ली अनेक मराठी सिनेमांची शूटिंग भारताबाहेर व्हायला लागली आहेत. त्यामुळे कामानिमित्त मराठी कलाकारांची परदेशवारी व्हायला लागली आहे. बरेच मराठी कलाकार हे मध्यमवर्गातून पुढे आलेत. त्यामुळे आजही त्यांना परदेशात फिरण्याचं अप्रूप वाटतंच.
गेल्या वर्षभरापासून संकर्षण मालिका आणि नाटक यामध्ये खूपच बिझी होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील त्याची समीर ही भूमिका खूपच लोकप्रिय आहे. या मालिकेतून संकर्षण पाच वर्षांनी मालिकेविश्वात परतला होता. या मालिकेपूर्वी ‘देवा शपथ’मध्ये मुख्य भूमिकेत संकर्षण दिसला होता. यंदा मालिकेसोबतच तो ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात अभिनय करत आहे.
माझ्यातल्या प्रेक्षकालाही तितकीच उत्सुकता, सुबोध भावे स्वत:च्याच सिनेमाबद्दल म्हणतोय बरंच काही
याशिवाय प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर यांच्या ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाचं दिग्दर्शनही संकर्षण करत आहे. मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यामुळे कविता करायला वेळ मिळत नसल्याची प्रांजळ कबुलीही संकर्षणने दिली. त्याच्या कवितेची पोस्ट व्हायरल झाली होती.
‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटात
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या