विद्यार्थ्यांच्या मोठा दिलासा; पुणे विद्यापीठाची वसतिगृहे सोमवारपासून सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आणि संलग्न महाविद्यालयांची वसतिगृहे अखेर सोमवार २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. ही माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासूनची विद्यार्थ्यांची वसतिगृह सुरू करण्याची मागणी होती. विद्यापीठ परिसरातील पीएचडी व स्पर्धा परीक्षा केंद्रातील वसतिगृहे पूर्ण तर इतर वसतिगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत.

पुणे विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने व पीएचडी तसेच स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र खोल्या असल्याने सोमवार २१ फेब्रुवारीपासून पीएचडी व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रत्यक्ष राहण्यास येण्याअगोदर त्यांनी कोविड प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे. याशिवाय कोविड व्यवस्थापनाबाबतचे राज्य आणि देशपातळीवरील निर्देश, नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे.

दिवाळीनंतर राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर एक ते दीड महिना महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होती. त्या वेळीही वसतिगृहे बंद ठेवण्यात आली. त्यानंतर करोनाच्या तिसऱ्या लाटेत महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहांची समस्या भेडसावली नाही. मात्र, आता एक फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा महाविद्यालये सुरू केल्याने इच्छा असूनही वसतिगृहे बंद असल्याने विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येऊ शकत नव्हते. या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
UGC Notice: यूजीसीकडून कॉलेज-विद्यापीठ पुन्हा सुरू करण्यास परवानगी
उच्च शिक्षणाला ऑफलाइन मुभा; यूजीसीच्या सूचना
दहावी-बारावी परीक्षांसाठी मोठ्या खोल्यांमध्ये झिग-झॅग बैठक

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

HPCL मध्ये सुरु आहे भरती, सरकारी नोकरीचा तपशील जाणून घ्या

HPCL Recruitment 2022: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL) HPCL ने इंजिनीअरिंग, …

JEE Main 2022: जेईई मुख्य सत्र २ साठी पुन्हा नोंदणी विंडो खुली, असा करा अर्ज

JEE Main 2022: जेईई मेन २०२२ सत्र २ परीक्षेसाठी नोंदणी विंडो पुन्हा एकदा उघडण्यात आली …