प्रसिद्ध फुटबॉलपटू सुरजीत सेनगुप्ता यांचं कोरोनामुळं निधन

Surjit Sengupta Passes Away: भारताचे माजी फुटबॉलपटू सुरजीत सेनगुप्ता यांचं आज कोरोनामुळं निधन झालंय. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सेनगुप्ता यांना 23 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र, आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. त्यांचं निधन क्रिडाविश्वासाठी मोठा धक्का मानला जात आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरजीत सेनगुप्ता यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. भारतानं 1970 साली एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकल होतं. त्यावेळी सुरजीतह हे भारतीय संघाचे भाग होते. 

सुरजीत सेनगुप्ता यांचा जन्म 30 ऑगस्ट 1951 साली हुगली जिल्ह्यातील चुचुंडामध्ये झाला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात किदरपोर क्लबसोबत झाली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत उत्तम कागगिरी करून दाखवली होती. सुरजीत यांनी 1975 साली शील्ड फायनलच्या मोहन बागान विरुद्ध त्यांचा पहिला गोल केला होता. 1979 शील्ड सेमीफायनलमध्ये त्यांनी थायलंड विद्यापीठाविरुद्ध शानदार गोल केला. त्यांनी 1978 मध्ये बर्दलाई ट्रॉफीमध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळ केला होता. 

ट्वीट-

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं शोकाकूळ
सुरजीत सेनगुप्ता यांच्या निधनानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केलाय. आज आपण सर्वोकृष्ट फुटबॉलपटू सुरजीत सेनगुप्तांना गमावलंय. फुटबॉल चाहत्यांचा हार्टथ्रोब आणि सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू असण्याव्यतिरिक्त, सुरजीत हे एक परिपूर्ण गृहस्थ होते. ते सदैव आपल्या हृदयात राहील”, अशा आशयाचं ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केलंय. 

हेही वाचा :  किंग कोहली आहे धोनीचा जबरा फॅन, स्टोरीला शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलात का?

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …