सीआयएसएफमध्ये या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ११४९ पदे भरली जाणार आहेत. अंदमान आणि निकोबार, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि सिक्कीम वगळता देशातील इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीआयएसएफ कॉन्स्टेबलची भरती केली जाणार आहे. रिक्त पदांची संख्या वाढवता किंवा कमी करता येते.
पगार
ही केंद्र सरकारची नोकरी आहे. त्यामुळे केंद्रीय वेतनश्रेणीनुसार पगारही मिळणार आहे. प्रारंभिक वेतनश्रेणी ३ अंतर्गत, सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबलच्या पदांसाठी निवडलेल्या तरुणांना प्रति महिना २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये प्रति महिना दिले जातील. याशिवाय इतर सर्व भत्त्यांसह पूर्ण वेतन मिळणार आहे.
पात्रता
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण असावेत. उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षांदरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ३ ते १० वर्षांपर्यंत सवलत मिळणार आहे.
असा करा अर्ज
सीआयएसएफ कॉन्स्टेबलच्या नोकरीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. फॉर्मची लिंक अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वर उपलब्ध आहे. याचे निर्देश वेबसाइटवर उपलब्ध आहेत. एससी, एसटी, माजी सैनिक, राखीव प्रवर्गासाठी कोणतेही अर्ज शुल्क नसेल. इतर सर्व उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
ही नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), ऑनलाइन पद्धतीने होणारी लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यातून जावे लागेल.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा