सलमानच्या कार वेगचा किती? पळून जाऊ लागला तर? आखलेला हत्येचा प्लॅन
‘मैने पायल छनकाई’, ‘मेरी चुनर उड उड जाए’, ‘याद पिया की आने लगी’, ‘अय्यो रामा हाथ से ये दिल ले गया’ ही गाणी आठवताहेत का. आठवलीच पाहिजेत इतकी या गाण्यांनी लोकप्रियता मिळवली होती. फाल्गुनीच्या गाण्यातील शब्द, तिचा मधाळ आवाज आणि तिच्या गाण्यात फुलणारी प्रेमकथा म्हणजे अफलातून होतं. फाल्गुनीच्या गाण्यातील ठेका दांडिया नृत्यासाठी तर एकदम परफेक्ट. त्यामुळे गरब्याच्या नवरात्री फाल्गुनीच्या गाण्यांशिवाय पूर्णच होत नाहीत.
यंदा फाल्गुनी तिचं नवं कोरं गाणं घेऊन आली आहे. दोन वर्षांनी फाल्गुनी तिचं नवं गाणं सादर करणार आहे. ‘वासलडी’ असं तिच्या गाण्याचं शीर्षक आहे. नुकतच हे गाणं रिलीज झालं असून येत्या नवरात्रात हे गाणं धुमशान केल्याशिवाय राहणार नाही हे आत्ताच या गाण्याला मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसत आहे. फाल्गुनी सांगतेय की हे असं गाणं आहे की दांडिया आणि गरबा प्रेमींच्या उत्साहाला चार चाँद लावेल.
नवरात्रीचा उत्सव देशभर साजरा केला जातो. पुढच्या आठवड्यात नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. अनेक ठिकाणी गरबा, दांडिया नृत्याचं , स्पर्धेचं आयोजन केलं जाणार हे नक्की. याकाळातच फाल्गुनीचं नवं गाणं धमाल करण्यासाठी सज्जं झालं आहे. फाल्गुनीने तिच्या सोशलमीडियावर हे गाणं शेअर केलं असून नेटकऱ्यांकडून या गाण्याला पसंती मिळत आहे.
सलमानला फार्महाउसवर मारण्याचं केलेलं प्लॅनिंग, बिश्नोईच्या प्लॅन बीचा खुलासा
फाल्गुनी म्हणतेय की मी नेहमीच माझ्या चाहत्यांचं प्रेम मिळवण्यासाठी गाणं तयार करते. यंदाच्या नवरात्रीत दांडियाप्रेमी चाहत्यांसाठी वसालडी हे गाणं माझ्याकडून भेट असेल. माझ्या या आधीच्या गाण्यांवर जसं त्यांनी प्रेम केलं तसच या नव्या गाण्यावरही त्यांनी प्रेम करावं. इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यालाही खास फाल्गुनी टच असल्याचं निर्माता विनोद भानुशाली याने सांगितलं. फाल्गुनीचा आवाज आणि जिगर सोनी, सुहराद सोनी यांनी गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. भोजक अशोक अंजाम यांनी हे गाणं लिहिलं आहे. दरवर्षी नवरात्रात नवीन गाणं आणण्याचा विचार फाल्गुनीने बोलून दाखवला आहे.
तु मेरे दिल मे रहने के लायक नही, राखी सावंतची आदिलवर मिश्किल टीप्पणी
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या