TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या – 

Oscar Awards 2022 : ‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक आहे. ‘ऑस्कर 2022’ (Oscar 2022) खूप खास असणार आहे. यंदा सिनेप्रेमींना पुरस्कार सोहळ्यात मतदान करता येणार आहे. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला ‘ऑस्कर पुरस्कार’ मिळवून देऊ शकतात. ‘फॅन फेव्हरेट’ असे या पुरस्काराचे नाव आहे. सिनेप्रेमींना हे मतदान ट्विटरद्वारे करायचे आहे. 27 मार्च रोजी ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळा होणार आहे.

Jersey Release Date : क्रिकेटप्रेमी आणि सिनेरसिक गेले अनेक दिवस शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ (Jersey) सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 31 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.  

Laal Singh Chaddha : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा ‘लाल सिंह चड्ढा’  (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आता 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण न झाल्याने निर्मात्यांनी रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमातील ‘जब सैंया’ (Jab Saiyaan) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे गायिका श्रेया घोषालने गायले आहे. गंगूबाईंच्या आयुष्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न या गाण्यात करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Anupam Kher : प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील डायलॉग आणि गाणीदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या आईने म्हणजेच दुलारी खेर यांनी देखील या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 

संबंधित बातम्या

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’चे नवे पोस्टर प्रदर्शित, ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Jersey Release Date : शाहिद कपूरचा ‘जर्सी’ सिनेमा 14 एप्रिलला होणार प्रदर्शित

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमातील ‘Jab Saiyaan’ गाणे रिलीज, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Happy Birthday Konkona Sen Sharma : राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी कोंकणा सेन शर्मा!

Konkona Sen Sharma : बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) आज 42 वा …

Akshaya Hardeek Wedding : नांदा सौख्यभरे! ‘अहा’चं दणक्यात पार पडलं लग्न

Akshaya Hardeek Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी …