Tag Archives: Team India

श्रेयस अय्यरनं जिंकला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार

ICC Men’s Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं आज (14 मार्च) फेब्रुवारी 2022 साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली. भारताचा तडाखेबाज फंलंदाज श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) फेब्रुवारी महिन्यातीलआयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकलाय. श्रेयसनं नुकतीच पार पडलेल्या श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिकेत धमाकेदार फलंदाजी केली होती. श्रीलंकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं सलग तीन अर्धशतक केलं होतं. …

Read More »

Kapil Dev :  भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा आवडता ऑलराऊंडर खेळाडू माहित आहे का? 

Kapil Dev : भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांना भारताचे सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. दरम्यान त्यांचा आवडता अष्टपैलू खेळाडू हा म्हणजे रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja). जाडेजा कोणत्याी परिस्थितीत दबावाखाली न खेळता, दमदार कामगिरी करत असल्याने कपिल यांचा जाडेजा आवडता अष्टपैलू खेळाडू आहे.   मला रवींद्र जाडेजाचा खेळ आवडतो – कपिल देव फरीदाबादमधील सर्वोदय रुग्णालयात एका …

Read More »

वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मांधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक

Smriti Mandhana: वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मांधनानं शतक झळकावलं आहे. डावखुरा फलंदाज स्मृती मानधनाने 108 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केलंय. स्मृती मंधानाचे महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दुसरं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी धावसंख्या गाठण्यासाठी भारताच्या संघाला एका मोठ्या डावाची गरज होती. स्मृती मांधनाचं शतक अत्यंत निर्णायक …

Read More »

अनुभवी खेळाडूंनी जबाबदारीनं खेळण्याची गरज- रमेश पवार

Women’s World Cup 2022: मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील तिसरा सामना धोकादायक वेस्ट इंडिजशी खेळत आहे. हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) हा सामना सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं होतं. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात भारतानं निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात भारताला 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर …

Read More »

विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यांत किवीजकडून भारताचा पराभव, कर्णधार मितालीनं सांगितलं कारण

IND vs NZ : आयसीसी महिला विश्वचषकाच्या दुसऱ्याच सामन्यात भारताला न्यूझीलंडने 62 धावांनी मात दिली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) मात दिल्यानंतर टीम इंडिया (Team India) विजयाची मालिका कायम ठेवू शकली नाही. दरम्या या पराभवाचं कारण कर्णधार मिथालीने सामन्यानंतर सांगितलं आहे. मिताली म्हणाली, ‘‘आमच्या फलंदाजांना पहिल्या फळीत आणि मध्यक्रमात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. समोरच्या संघाने 250 ते 260 रन …

Read More »

‘मला स्वप्नातंही वाटलं नव्हतं…’ मुलाखतीदरम्यान रोहित शर्मा झाला भावूक

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात मिळालीय. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघानं बांगलादेशविरुद्ध मोहाली येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. पहिल्या कसोटी सामन्यानंतर रोहितनं अलीकडंच बीसीसीआयला एक मुलाखत दिली. ज्यात तो भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये …

Read More »

रविंद्र जाडेजाच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद

IND vs SL Test Match, Day 3 : सध्या मोहाली येथ भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून मोहाली कसोटीत श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 174 धावांत ऑलआऊट झाला. त्या आधी भारताने पहिला डाव 574 धावांवर घोषित केला होता. आता त्यांनी श्रीलंकेच्या संघाला फॉलोऑन दिला आहे. टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने शानदार गोलंदाजी करत पाच …

Read More »

AFC U-23 Asian Cup : कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय संघात, आशियाई स्पर्धेत मैदानात उतरणार

Aniket Jadhav : मागील काही वर्षात भारतात फुटबॉल खेळाला ‘अच्छे दिन’ येत आहेत. इंडियन सुपर लीग सारखी मोठी स्पर्धा भारतात खेळवली जात आहे. आता अंडर 19 आशियाई कप संघात भारत खेळणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी कोल्हापूरचा आघाडीचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव (Aniket Jadhav) याचं भारतीय फुटबॉल संघात (Indian Football Team) सिलेक्शन झालं आहे. अनिकेतच्या या सिलेक्शननंतर अनेकांनी त्याला ट्वीट करत शुभेच्छा …

Read More »

VIDEO : विराटची शंभरावी कसोटी टीम इंडियाकडून आणखी खास, गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मान

मोहाली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी मोहालीमध्ये सुरु असलेला कसोटी सामना खास आहे. हा विराटच्या कसोटी कारकीर्दीतील शंभरावा सामना आहे. ही मॅच आणखी खास बनवण्यासाठी टीम इंडियाने खास पद्धत अवलंबली. पहिला डाव घोषित केल्यानंतर जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला तेव्हा विराट कोहलीला संघाच्या सदस्यांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. भारतीय संघाने मोहाली कसोटीत आपला पहिला डाव 574 …

Read More »

पहिल्या दिवसाअखेर भारताची 357 धावांपर्यंत मजल; विराट 45 धावांवर बाद

IND vs SL, 1st Test, Mohali: भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. यामध्ये भारताने सहा गड्यांच्या बदल्यात 357 धावा केल्या आहेत. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली 45 धावांवर बाद झाला आहे. आर अश्विन 10 धावांवर तर रविंद्र जाडेजा 45 धावांवर खेळत आहे. मोहाली येथे भार विरुद्ध श्रीलंका …

Read More »

IND vs SL, Mohali Test : कोहलीविषयी केलेली भविष्यवाणी खरी ठरली

IND vs SL : मोहालीत आजपासून भारत वि. श्रीलंका पहिल्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे.  हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) खास आहे. कारण विराटसाठी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. विराटने आपल्या शंभराव्या कसोटीमध्ये 45 धावा केल्या आहेत. विराटने पाच चौकरांसह 45 धावा केल्या आहेत. कोहलीला स्पिनर लसिथ एम्बुलडेनियाने बोल्ड केले.  परंतु विराट कोहली 100 व्या कसोटी …

Read More »

Women’s World Cup : आजचे Google Doodle महिला क्रिकेटसाठी समर्पित! विश्वचषकाला जोरदार सुरूवात

Women’s World Cup : : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( ICC Women ODI World Cup 2022 ) या स्पर्धेला (4 मार्च) पासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळी 6.30 वाजता विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली.  याच पार्श्वभूमीवर Google ने सुद्धा आज ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 च्या शुभारंभानिमित्त खास Doodle साकारून महिला क्रिकेटपटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचे गुगूल डूडल …

Read More »

IND vs SL LIVE Update : टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

IND vs SL Test : भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील ही 100वी कसोटी आहे. तर रोहित शर्मासाठीही हा सामना फार …

Read More »

आजापासून महिला क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात; पहिल्या सामन्यात टीम इंडियाला भिडणार पाकिस्तानला

Women’s World Cup : आजपासून महिला क्रिकेट विश्वचषक 2022 स्पर्धेची सुरुवात (ICC Womens Cricket World Cup 2022) होणार आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे. विश्वचषकाचा सलामीचा सामना स्पर्धेचं यजमान असलेल्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात आठ संघांमध्ये 27 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रकानुसार, चार …

Read More »

IND vs SL Test : विराट कोहलीचा 100वा कसोटी सामना, रोहित शर्मासाठीही महत्त्वाचा दिवस

IND vs SL Test : मोहालीमध्ये शुक्रवारपासून सुरू होणारा कसोटी सामना विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासाठी खूप खास असेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा हा सामना कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना (Virat Kohli’s 100 th Test Match) असेल. दुसरीकडे, रोहित शर्मा हा सामना जिंकून भारताचा 35 वा कसोटी कर्णधार म्हणून धमाकेदार कामगिरी करण्याची अपेक्षा …

Read More »

Virat Kohli: विराट कोहली 100 कसोटीसाठी सज्ज; क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव

मोहाली: भारतीय क्रिकेट आणि विराट कोहलीसाठी शुक्रवारचा दिवस काही खास असणार आहे. मोहालीमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये पहिला कसोटी सामना रंगणार असून विराट कोहलीचा हा 100 वा कसोटी सामना असणार आहे. आपल्या 100 व्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली सज्ज झाला असून क्रिडाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशा प्रकारे 100 कसोटी सामना खेळणारा विराट कोहली हा 12 वा भारतीय खेळाडू ठरणार …

Read More »

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला कोहलीच्या जागी फलंदाजी करायला का आवडतं?, स्वत:च सागितलं कारण

Shreyas Iyer: भारतीय संघात सध्या धडाकेबाज खेळाडूंची फौजच आहे. युवा फलंदाज दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताला सामन्यांत यश मिळवून देत आहेत. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेत भारताचा श्रेयस अय्यर चांगलाच चमकला. त्याने तीनच्या तीन टी20 सामन्यात अर्धशतकं झळकावली. त्याने ही तीनही अर्धशतकं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ठोकली आहेत. ही जागा मूळात विराट कोहली याची असल्याने आता त्याच्या संघात …

Read More »

कोहली, सुर्यकुमार संघात परतल्यानंतर श्रेयसनं कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला यावं? गावस्कर म्हणाले

Shreyas Iyer: मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध (IND Vs SL) खेळण्यात आलेल्या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत त्यानं धावांचा पाऊस पाडला. त्यानं सलग तीन सामन्यात शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. श्रेयसच्या या कामगिरीमुळं टीम मॅनेजमेंटसमोर संघ निवडीचा पेच वाढणार आहे. कारण, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांना संघ व्यवस्थापनानं विश्रांती दिलीय. विराटच्या अनुपस्थित …

Read More »

IND vs SL : … तर भारताचे टी-20 मधील अव्वल स्थान जाणार

Team India T20I Ranking : नुकत्याच झालेल्या टी 20 मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केले होते. वेस्ट इंडिजचा 3-0 च्या फराकाने पराभव केल्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला. जवळपास चार ते पाच वर्षानंतर भारतीय संघ टी 20 क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर पोहचला आहे. पण पहिल्या स्थानावर कायम राहणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक आहे. भारतीय संघाला टी20 मध्ये …

Read More »

वेंकटेश अय्यरच्या रुपात Team India ला मिळाला नवा फिनीशर, हार्दिक पंड्याला घेऊन मीम्स व्हायरल

Indian Cricket Team : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात नुकतीच टी20 मालिका पार पडली. यावेळी भारताने विंडीजवर 3-0 ने विजय मिळवला. दरम्यान या मालिकेत सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. पण युवा खेळाडू वेंकटेश अय्यरच्या लक्षवेधी कामगिरीमुळे भारतीय संघाला एक नवा फिनीशर मिळाला आहे. अय्यरने तीन टी20 सामन्यांत 92 धावा केल्या. त्याने एका सामन्यात धडाकेबाज अशा नाबाद 35 धावाही ठोकल्या. दरम्यान अय्यरच्या या …

Read More »