वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मांधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक

Smriti Mandhana: वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मांधनानं शतक झळकावलं आहे. डावखुरा फलंदाज स्मृती मानधनाने 108 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केलंय. स्मृती मंधानाचे महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दुसरं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी धावसंख्या गाठण्यासाठी भारताच्या संघाला एका मोठ्या डावाची गरज होती. स्मृती मांधनाचं शतक अत्यंत निर्णायक वेळी आलंय. 

स्मृती मानधनानं वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरे शतक ठोकून एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावलं आहे. तिनं ही पाच शतके विदेशी मैदानावर झळकावली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या कामगिरीसह स्मृती मांधनानं भारताची कर्णधार मिताली राजचा घराबाहेर सर्वाधिक 4 शतकांचा भारतीय विक्रम मोडला आहे.

संघ-

भारताचा संघ-
यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंह, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, तानिया भाटिया, रेणुका सिंग, शफा वर्मा सिंह.

वेस्ट इंडीजचा संघ-
डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, किसिया नाइट, स्टॅफनी टेलर (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेले (विकेटकिपर), चेडियन नेशन, चिनेल हेन्री, आलिया अॅलीने, शमिलिया कोनेल, अनीसा मोहम्मद, शकेरा सेलमनबेंचअफी फ्लेचर, करिश्मा रामहारक, रशादा विल्यम्स, राशदा फ्रेचर.

हेही वाचा :  रोहित दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार? या खेळाडूला मिळू शकते संधी

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …