‘तुझा भाऊच तुझा बाप आहे हे मुलीला कसं सांगू’, महिलेने कुटुंबातील धक्कादायक सत्य केलं उघड

आपल्या मुलीचा भाऊच तिचा बाप असल्याचा खुलासा एका महिलेने केला आहे. पण ही गोष्ट आपल्या मुलीला माहिती नसल्याचंही तिने सांगितलं आहे. आता ही गोष्ट मुलीला नेमकी काय सांगायची कशी याची चिंता महिलेला सतावत आहेत. यासाठी तिने आपली ओळख लपवत हा प्रश्न विचारला आहे. आता भाऊ हाच मुलीचा बाप कसा काय असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच….जाणून घ्या हे प्रकरण नेमकं काय आहे. 

‘द अटलांटिक’च्या डियर थेरेपिस्ट कॉलममध्ये महिलेने आपली ओळख लपवत ही माहिती उघड केली आहे. यामध्ये तिने सांगितलं आहे की, पतीशी भेट होण्याआधी त्याचे एका महिलेशी संबंध होते. या महिलेपासून त्याला दोन मुलं होती. लग्नानंतर आपल्यालाही मुलं व्हावीत असं वाटत होतं. पण पतीने नसबंदी केली असल्याने ते शक्य नव्हतं. 

मूल जन्माला घालण्यासाठी निवडला अजब मार्ग

होणारं मूल आपल्यासारखंच दिसावं अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी एक अजब मार्ग शोधला. अटलांटिकला लिहिलेल्या पत्रात या महिलेने सांगितलं आहे की, “आम्हाला स्पर्म बँकेचा वापर करायचा नव्हता. यामुळे मग आम्ही पतीच्या मुलालाच डोनर होण्यास सांगितलं”.

हेही वाचा :  ...अन् बापाने तिन्ही मुलांना रांगेत उभं करुन घातल्या गोळ्या; मुलगी बाहेर रस्त्यावर ओरडत सुटली; एकच थरार

“तिचा बाप तिचा आजोबा आहे हे कसं सांगणार?”

महिलेने पुढे लिहिलं आहे की, “आम्हाला वाटलं हा फार योग्य निर्णय होता. यामुळे आमच्या मुलांमध्ये पतीचे जनुके असावे अशी आमची इच्छा होती. तसंच माझ्या सावत्र मुलाचं आरोग्य, बुद्धिमत्ता यांची आम्हाला चांगली कल्पना होती. तोदेखील मदत करण्यास तयार झाला होता”.

“माझी मुलगी आता 30 वर्षांची आहे. तिच्या जन्माच्या तीन दशकांनंतरही आम्ही तिच्यापासून सत्य लपवलं आहे. आता तिला तिचे वडीलच आजोबा आहेत, तसंच तिचा भाऊ तिचा बाप आहे हे कसं सांगावं ही मोठी अडचण आमच्यासमोर आहे. याशिवाय तिची बहिण तिची आत्या आहे”.

हे सर्व सांगितल्यानंतर आपली मुलगी काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज नाही. त्यामुळे आपल्याला फार चिंता सतावत असल्याचं तिने म्हटलं आहे. “माझ्या पतीसाठीही हे फार कठीण आहे. कारण त्यांना आपल्या मुलीला मीच तिचा बाप असल्याचं सांगायचं आहे,” असं महिलेने म्हटलं आहे. 

“माफी मागण्याआधी तिच्याशी बोला”

महिलेच्या पोस्टला मानसोपचारतज्ज्ञ आणि स्तंभलेखक लोरी गोटलिब यांनी उत्तर दिलं आहे. आपल्या मुलीची माफी मागण्याआधी तिच्यासह बसा आणि शांतपणे सगळं समजावून सांगा. 30 वर्षं आपण सत्य लपवलं याची जबाबदारी घेण्याचा आग्रह करताना त्यांनी सांगितलं आहे की, बोलताना तिच्यावर आपला हक्क गाजवू नका. तसंच मुलीच्या भावाशीही आधी चर्चा करा. जेणेकरुन त्याच्या प्रतिक्रियेमुळे तिला आश्चर्य वाटणार नाही असा सल्ला दिला आहे. हे सांगणं सोपं नाही, पण सत्य सांगणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा :  "अशक्त आणि म्हातारी झालीये...", 5 वर्षांनी आईला पाहून मुलाचं मन आलं भरुन; खांद्यावर उचलून घेतलं अन् थेट...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …