Tag Archives: Maharashtra

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Latest News : ऑगस्ट महिन्यात रुसलेला वरुण राजा पुन्हा एकदा जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईत ऑरेंज अलर्ट असणार आहे. या काळात मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति-मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता …

Read More »

भर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

Maratha Andolan : कुणबी प्रमाणपत्राबाबत (Kunbi certificates) जीआरमध्ये (GR) सुधारणा करण्यासंदर्भात मनोज जरांगेंच्या वतीनं 5 जणांचं शिष्टमंडळ (Delegation) मुंबईत येणार आहे.  मुंबईत हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीची  बैठक होणार आहे. त्या बैठकीत नव्या जीआरबाबत चर्चा करून निर्णय होण्याची शक्यता आहे,  निजामकालीन दस्तऐवज प्राप्तदरम्यान, हैदराबादमधील निजामकालीन दस्तऐवज राज्य सरकारच्या समितीला प्राप्त झालेत. यात निजामकालीन …

Read More »

प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मलई पेढा (Malai Pedha) म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. कोणालाही हवाहवासा असा मलई पेढा. अगदी देवदर्शनाला गेल्यावरही देवाला पेढ्याचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र हाच पेढा तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतो. देवाचा प्रसाद म्हणून खात असलेला पेढा नीट पाहूनच खा. नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलच गाठावं लागेल. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar). …

Read More »

अणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथल्या श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे गणेश मंदिर आहे. श्री खंडोबा भाविकांना विश्राम आणि  निवास करता यावा म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास निधीतून या मंदिरात भवन बांधण्यात आलं आहे. 16 लाखाचे काम अंदाजपत्राला बगल देऊन अत्यंत थातुरमाथुर आणि निकृष्ट  करण्यात आलं आहे. दोन महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या या भवनला सध्या पावसामुळे गळती लागली …

Read More »

मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्…; 15 महत्त्वाचे मुद्दे

Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने राज्यभरामध्ये मागील दोन दिवसांपासून निषेध केला जात असतानाच आजचा दिवस यासंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी रात्री जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि शिंदे सरकारची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज अंतरवाली सराटी गावाला भेट देणार …

Read More »

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम

Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या मराठा आंदोलकांची आणि सरकारची चर्चा निष्फळ ठरली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणेही होते.  सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.. मात्र दोन दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. …

Read More »

जालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय

Jalana Maratha Reservation Protest:   जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षकांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा …

Read More »

1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट

Nanded Crime News :  आतापर्यंत तुम्ही फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील मात्र मराठवाड्यात एका टोळीनं दामदुप्पटीचा स्कॅम करत लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. या टोळीनं गावोगावी एजंट नेमले. स्वस्तात अन्नधान्य, अत्यंत कमी दरात इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन, लॅपटॉप देण्याचं आमिष दाखवलं, इतकच नाही तर विधवा महिलांना पेन्शन देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडूनही पैसे उकळले. प्रत्यक्ष परतावा देण्याची वेळ आली तेव्हा या भामट्यांनी हात …

Read More »

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी

Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या अंतरावली सराटी इथं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आंदोलकांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी 40 वर्षात काय केलं असा सवाल करत आंदोलकांनी गोंधळ केला. शरद पवारांनी परत जावं अशा घोषणाही आंदोलकांनी दिला.  कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला? शरक पवारांनी केली चौकशीची मागणी जालन्यातील आंदोलनात कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला असा …

Read More »

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या

Jalana Maratha Andolan :  जालन्यातील लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतप्त आंदोलकांनी 12 बसेस पेटवून दिल्या आहेत. एकट्या शहागड बस स्थानकात 6 बसेस पेटवून देण्यात आल्या आहेत.  जालनातल्या लाठीचार्जचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर संभाजीनगर बीड बायपासवर रास्ता रोको करण्यात आला. राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. बीड बंदची हाक जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ …

Read More »

जालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ… मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Jalana Maratha Andolan : जालन्यातलं मराठा आंदोलन (Maratha Andolan) चिघळलंय. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज (Lathicharge) केला. अंतरावली सराटी इथं हा प्रकार घडलाय. मराठा आरक्षणाच्या (Mararha Reservation) मागणीसाठी इथं आंदोलन सुरू होतं. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु बसले होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी …

Read More »

नवा नियम! वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचारच सोडा, नाहीतर शिक्षा भोगा…

Maharashtra News: रस्त्यानं प्रवास करत असताना आपली नजर नकळतच इतर वाहनांवर जाते आणि त्या वाहनांमध्ये किमान अशी एक गोष्ट तरी नक्कीच आढळते जी आपलं लक्ष वेधते. आपण वळून वळून तीच गोष्ट पाहत असतो. प्रवास शहरातील असो किंवा खेड्यातील. आपलं हे निरीक्षण सुरुच राहतं. फक्त नजरेत पडणाऱ्या गोष्टी प्रांताप्रांतानुसार बदलतात. याच नजरेस पडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे वाहनं आणि त्यांच्यावर असणाऱ्या नंबर …

Read More »

ऐन सणासुदीला पुण्यात पाणीकपात; ‘या’ भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

सागर आव्हाड, झी मीडिया Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्या गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी पनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर, भामा- आसखेड, पंपिंग येथील विद्युत, पंपिंगविषयक आणि  दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळं पाणीपुरवठा विभागाने …

Read More »

पुण्यात दादा विरुद्ध दादा? अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात ‘या’ कारणाने कोल्डवॉर

Maharashtra Politics : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.. अजित पवारांच्या  मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. खुद्द शरद पवार या बैठकीत उपस्थित होते. पण अर्थमंत्री अजित पवारांकडून निधीला …

Read More »

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली ‘ही’ अपडेट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट महिना संपायला आला तरी पाहिजे तसा पाऊस पाहायला मिळत नाही. त्यामुळे पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.  दुसरीकडे राज्यात मागील 2 ते 3 दिवसात पाऊस पडल्याचे दिसून …

Read More »

‘कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यासाठी…’; अजित पवारांचा उल्लेख करत कोश्यारी मोठ्याने हसू लागले

Bhagat Singh Koshyari On Ajit Pawar Deputy Cm Post: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ‘इंडिया टुडे’च्या कार्यक्रमामध्ये राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत भगत सिंह कोश्यारींनी हे विधान केलं आहे. कोश्यारी हे ‘इंडिया टुडे स्टेट ऑफ द स्टेट : उत्तारखंड फर्स्ट’ या कार्यक्रमात सहाभागी झाले होते. तेव्हा …

Read More »

अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Position of Ajit Pawar in NCP: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. पार्टीत विभाजन झाले आहे हे खरे आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. …

Read More »

खाकीसाठी बोगस सर्टिफिकेट्स, राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा उघड

पुणे : राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भूकंपग्रस्तांचं बोगस कागदपत्र (Bogus Documents) बनवून पोलिसाची नोकरी मिळवण्याचे प्रकार घडलेत. अशाच एका रॅकेटचा (Racket) पुण्यात भांडाफोड झालाय.. शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस शिपाई गोविंद इंगळेचं प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं.. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट भूकंपग्रस्त (Earthquake Victims) प्रमाणपत्राचं एक रॅकेट परभणीत नुकतंच उघडकीस आलं. त्याच्या …

Read More »

वॉकीटॉकी, टॅब, मोबाईल! राज्यातल्या तलाठी परीक्षेत हायटेक कॉपी… पोलिसही हैराण

सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : शासनाने राज्यभरातील एकूण 4344 तलाठी (Talathi) पदाची भरती जाहीर केली. या परीक्षेला गुरुवार पासून सुरु झाली आहे. मात्र एका परीक्षा केंद्रा बाहेर हाय टेक पद्धतीन कॉपी (Hi-Tech Copy) करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गणेश गुसिंगे या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या संशयिताकडून वॉकी टॉकी, हेडफोन, टॅब, दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या …

Read More »

माझ्या भावाच्या हत्येचा तपास कुठे अडकला, आठवड्याला शरीराचा एक भाग कापणार म्हणत एक बोट छाटलं

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी (Jyoti Kalani) यांचे स्वीय सहाय्यक (Personal Assistant) नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली होती. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केलं …

Read More »