40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी

Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या अंतरावली सराटी इथं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आंदोलकांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी 40 वर्षात काय केलं असा सवाल करत आंदोलकांनी गोंधळ केला. शरद पवारांनी परत जावं अशा घोषणाही आंदोलकांनी दिला. 

कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला? शरक पवारांनी केली चौकशीची मागणी

जालन्यातील आंदोलनात कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला असा सवाल करत शरद पवारांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केलीय. सरकारने आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला असा आरोपही पवारांनी केलाय. तर दुसरीकडे मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र आणि राज्याने पुढाकार घ्यावा. कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू न देता तोडगा काढावा, राष्ट्रवादीचं सहकार्य राहिल अशीही स्पष्ट भूमिका शरद पवारांनी जाहीर केलीय ़

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलीय. जालन्यातील लाठीचार्जची घटना दुर्दैवी आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असंही एकनाथ शिंदेंनी म्हंटलंय. मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलंय. 

हेही वाचा :  बीडमध्ये आमदाराचं घर जाळणारे ते 14 संशयित मराठा नव्हते? हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय

मराठा समाज बांधवांची मुंबईत आंदोलनाची हाक 

जालन्यातील लाठीचार्जचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी मराठा समाज बांधवांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिलीय. दादरमधल्या हुतात्मा कोतवाल उद्यान इथं सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणारंय. या आंदोलनात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होणार आहेत. या आंदोलनानंतर मुंबईमध्ये विभागवार आंदोलन केली जाणार आहेत. 

जालन्यातील आंदोलनात 64 जण जखमी 

जालन्यातील आंदोलनात आतापर्यंत 64 जण जखमी झाले आहेत. यात 57 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. या 57 पैकी 19 महिला कर्माचारी आहे. 20 जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येतंय. तर या आंदोलनात आतापर्यंत 7 नागरिक जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाचं उपोषण आंदोलन सुरू होतं. त्यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला. त्याचं रूपांतर दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये झालं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …