Tag Archives: Maharashtra

‘…तसं असेल तर दाखवून द्या’, अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये जोरदार खडाजंगी; बैठकीतच भिडले

ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. बैठकीतच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांनी मांडलेल्या आकडेवारीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला. आकडेवारी खरी असेल तर दाखवून द्यावी असं थेट आव्हानच अजित पवारांनी छगन भुजबळ यांना दिलं.  ओबीसींच्या संदर्भात सर्वपक्षीय आणि काही संघटनांसह बैठक आयोजित करण्यात …

Read More »

डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात डिओडरंटचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे शेजारच्यांच्या घरातील काचा फुटल्या. एवढंच नव्हे …

Read More »

शर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात… चार जणांविरोधात गुन्हा दाखल

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : मारामारी, चोरी किंवा इतर वेगवेगळ्या कारणावरुन एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं आपण अनेकवेळा ऐकलं असेल. पण कधी शर्टाचं बटण उघडं ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे. नांदेडमध्ये एक, दोन नाही तर चक्क चारजणांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हे अपवादात्म प्रकरण असल्याने राज्याभरात चर्चेचं कारण ठरलं आहे.  काय आहे …

Read More »

बाप की हैवान! 8 दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात कोंबला तंबाखू … मुलीचा मृत्यू

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : बाप इतका क्रुर असतो का? पोटच्या मुलीची इतक्या निर्घृणपणे हत्या करु शकतो का? ही बातमी वाचून असे अनेक प्रश्न मनात उभे राहतील. हैवानही लाजेल इतकी क्रुर हत्या एका बापाने आपल्या लेकीची केलीय. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात समोर आली आहे. अवघ्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात बापाने तंबाखू (Tobacco) कोंबून तिची हत्या …

Read More »

ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा चहा होणार ‘कडू’!, साखर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार?

Sugar Price: आता नागरिकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा चहा ‘कडू’ होण्याची शक्यता आहे. टॉमेटोचे दर महागल्यानंतर आता साखर आपला रंग दाखवणार आहे. लवकरच साखर देखील महागणार असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्पादनात घट झाल्यानं साखरेचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमी …

Read More »

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Latest News : ऑगस्ट महिन्यात रुसलेला वरुण राजा पुन्हा एकदा जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईत ऑरेंज अलर्ट असणार आहे. या काळात मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति-मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता …

Read More »

भर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

Maratha Andolan : कुणबी प्रमाणपत्राबाबत (Kunbi certificates) जीआरमध्ये (GR) सुधारणा करण्यासंदर्भात मनोज जरांगेंच्या वतीनं 5 जणांचं शिष्टमंडळ (Delegation) मुंबईत येणार आहे.  मुंबईत हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीची  बैठक होणार आहे. त्या बैठकीत नव्या जीआरबाबत चर्चा करून निर्णय होण्याची शक्यता आहे,  निजामकालीन दस्तऐवज प्राप्तदरम्यान, हैदराबादमधील निजामकालीन दस्तऐवज राज्य सरकारच्या समितीला प्राप्त झालेत. यात निजामकालीन …

Read More »

प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मलई पेढा (Malai Pedha) म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. कोणालाही हवाहवासा असा मलई पेढा. अगदी देवदर्शनाला गेल्यावरही देवाला पेढ्याचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र हाच पेढा तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतो. देवाचा प्रसाद म्हणून खात असलेला पेढा नीट पाहूनच खा. नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलच गाठावं लागेल. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar). …

Read More »

अणदूर : श्री खंडोबा भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या भवनला पावसाळयात गळती

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथल्या श्री खंडोबा मंदिराच्या पाठीमागे गणेश मंदिर आहे. श्री खंडोबा भाविकांना विश्राम आणि  निवास करता यावा म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास निधीतून या मंदिरात भवन बांधण्यात आलं आहे. 16 लाखाचे काम अंदाजपत्राला बगल देऊन अत्यंत थातुरमाथुर आणि निकृष्ट  करण्यात आलं आहे. दोन महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या या भवनला सध्या पावसामुळे गळती लागली …

Read More »

मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्…; 15 महत्त्वाचे मुद्दे

Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने राज्यभरामध्ये मागील दोन दिवसांपासून निषेध केला जात असतानाच आजचा दिवस यासंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी रात्री जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि शिंदे सरकारची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज अंतरवाली सराटी गावाला भेट देणार …

Read More »

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; दोन दिवसांत आरक्षण देण्याचा आंदोलकांचा अल्टीमेटम

Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या मराठा आंदोलकांची आणि सरकारची चर्चा निष्फळ ठरली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सरकारचे प्रतिनिधी म्हणून जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणेही होते.  सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजनांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली.. मात्र दोन दिवसांत आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. …

Read More »

जालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय

Jalana Maratha Reservation Protest:   जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षकांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा …

Read More »

1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट

Nanded Crime News :  आतापर्यंत तुम्ही फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील मात्र मराठवाड्यात एका टोळीनं दामदुप्पटीचा स्कॅम करत लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. या टोळीनं गावोगावी एजंट नेमले. स्वस्तात अन्नधान्य, अत्यंत कमी दरात इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन, लॅपटॉप देण्याचं आमिष दाखवलं, इतकच नाही तर विधवा महिलांना पेन्शन देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडूनही पैसे उकळले. प्रत्यक्ष परतावा देण्याची वेळ आली तेव्हा या भामट्यांनी हात …

Read More »

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी

Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या अंतरावली सराटी इथं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आंदोलकांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी 40 वर्षात काय केलं असा सवाल करत आंदोलकांनी गोंधळ केला. शरद पवारांनी परत जावं अशा घोषणाही आंदोलकांनी दिला.  कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला? शरक पवारांनी केली चौकशीची मागणी जालन्यातील आंदोलनात कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला असा …

Read More »

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या

Jalana Maratha Andolan :  जालन्यातील लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतप्त आंदोलकांनी 12 बसेस पेटवून दिल्या आहेत. एकट्या शहागड बस स्थानकात 6 बसेस पेटवून देण्यात आल्या आहेत.  जालनातल्या लाठीचार्जचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर संभाजीनगर बीड बायपासवर रास्ता रोको करण्यात आला. राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. बीड बंदची हाक जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ …

Read More »

जालनातलं मराठा आंदोलन चिघळलं, लाठीचार्ज आणि जाळपोळ… मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Jalana Maratha Andolan : जालन्यातलं मराठा आंदोलन (Maratha Andolan) चिघळलंय. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज (Lathicharge) केला. अंतरावली सराटी इथं हा प्रकार घडलाय. मराठा आरक्षणाच्या (Mararha Reservation) मागणीसाठी इथं आंदोलन सुरू होतं. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु बसले होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते. पण पोलिसांनी …

Read More »

नवा नियम! वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचारच सोडा, नाहीतर शिक्षा भोगा…

Maharashtra News: रस्त्यानं प्रवास करत असताना आपली नजर नकळतच इतर वाहनांवर जाते आणि त्या वाहनांमध्ये किमान अशी एक गोष्ट तरी नक्कीच आढळते जी आपलं लक्ष वेधते. आपण वळून वळून तीच गोष्ट पाहत असतो. प्रवास शहरातील असो किंवा खेड्यातील. आपलं हे निरीक्षण सुरुच राहतं. फक्त नजरेत पडणाऱ्या गोष्टी प्रांताप्रांतानुसार बदलतात. याच नजरेस पडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे वाहनं आणि त्यांच्यावर असणाऱ्या नंबर …

Read More »

ऐन सणासुदीला पुण्यात पाणीकपात; ‘या’ भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

सागर आव्हाड, झी मीडिया Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्या गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी पनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी. वारजे जलकेंद्र, नवीन होळकर, भामा- आसखेड, पंपिंग येथील विद्युत, पंपिंगविषयक आणि  दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळं पाणीपुरवठा विभागाने …

Read More »

पुण्यात दादा विरुद्ध दादा? अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात ‘या’ कारणाने कोल्डवॉर

Maharashtra Politics : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात कोल्ड वॉर रंगल्याची चर्चा आहे. पुण्यातल्या अजित पवारांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे.. अजित पवारांच्या  मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत 400 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. खुद्द शरद पवार या बैठकीत उपस्थित होते. पण अर्थमंत्री अजित पवारांकडून निधीला …

Read More »

महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार? हवामान विभागाने दिली ‘ही’ अपडेट

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट महिना संपायला आला तरी पाहिजे तसा पाऊस पाहायला मिळत नाही. त्यामुळे पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावरही चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत.  दुसरीकडे राज्यात मागील 2 ते 3 दिवसात पाऊस पडल्याचे दिसून …

Read More »