बाप की हैवान! 8 दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात कोंबला तंबाखू … मुलीचा मृत्यू

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : बाप इतका क्रुर असतो का? पोटच्या मुलीची इतक्या निर्घृणपणे हत्या करु शकतो का? ही बातमी वाचून असे अनेक प्रश्न मनात उभे राहतील. हैवानही लाजेल इतकी क्रुर हत्या एका बापाने आपल्या लेकीची केलीय. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात समोर आली आहे. अवघ्या आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात बापाने तंबाखू (Tobacco) कोंबून तिची हत्या केली. इतक्यावरच हा हैवान बाप थांबला नाही. त्या चिमुकलीच्या मृतदेहाची विल्हेवाट त्याने लावली. आशा कर्मचाऱ्यांच्या (Asha Workers) सतर्कतेमुळे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आणि आरोपी बापाला अटक करण्यात आली.

का केली चिमुकलीची हत्या
जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधल्या हरिनगर तांजा इथं गोकुळ मोतीराम जाधव हा आपल्या कुटुंबासोबत राहातो. गोकुळ जाधवला याआधी दोन मुली आहेत. 2 सप्टेंबरला वाकोद प्राथमिक आरग्य केंद्रात त्याच्या पत्नीने तिसऱ्या मुलीला जन्म दिला. काही दिवसांनी पत्नी आणि नवजात बाळ घरी आलं. पण तिसरीही मुलगी झाल्याने गोकुळच्या मनात प्रचंड संताप होता. तिचं तोंडही तो बघत नव्हता. अखेर 10 सप्टेंबरला हैवान आरोपीने धक्कादायक पाऊल उचललं. गोकुळने अवघ्या 8 दिवसांच्या लेकीच्या तोंडात तंबाखू कोंबला आणि तिची हत्या केली. 

हेही वाचा :  'भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार', झी 24 तासच्या सहकार परिषदेत प्रवीण दरेकरांचे संकेत

यानंतर या नराधमाने चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. फर्दापूर-वाकोद रस्त्यावर त्याने एक खड्डा खणला आणि त्यात चिमुरडीचा मृतदेह पुरला. त्यानंतर तो घरी निघून आला. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीनेही याबाबत कोणालाही सांगितलं नाही. 

अशी झाली गुन्ह्याची उकल
हत्येच्या दोन दिवसांनी आशा सेविका नवजात बाळाची नोंद घेण्यासाठी गोकुळ जाधवच्या घरी गेल्या. पण घरात त्यांना कुठेही बाळ दिसलं नाही. त्यामुळे आशा सेविकांना संशय आला आण त्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप कुमावत यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेत 12 सप्टेंबरला हरिनगर तांजा इथल्या गोकुळ जाधवच्या घरात धडक मारली. बाळ कुठे आहे याची विचारपूस केल्यावर आरोपी गोकुळे उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर आजारपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितंल. पण डॉ संदीप कुमावत यांना त्याच्या उत्तराने समाधान झालं नाही.

डॉ संदीप कुमावत यांनी खोलात जाऊन गोकुळ जाधवकडे विचारणा केली. अखेर आरोपी गोकुळने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. 10 सप्टेंबर म्हणज रविवारी आरोपी गोकुळने लेकीच्या तोंडात तंबाकू कोंबला. त्यानंतर तिला झोळीत झोपलं. काही वेळातच त्या निष्पाप चिमुरडीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच रात्री तिचा मृतदेह घेऊन तो फर्दापूर-वाकोद रस्त्यावर पोहोचला. तिथे त्याने खड्डा खणून त्यात तो मृतदेह पुरला. 

हेही वाचा :  Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हाआम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

या घटनेची माहिती डॉ संदीप कुमावत यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी गोकुळ जाधवला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Godrej Family Tree : लहानपणी तुमच्याही घरात असेल या कंपनीचे कपाट, आता 14 लाख कोटींची कंपनी

देशातील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक असलेले गोदरेज कुटुंब आज तब्बल 127 वर्षांनंतर विभक्त होणार आहे. …