शानदार, जबरदस्त! आयफोनमध्ये क्रांतीकारी बदल… ‘हे’ फिचर्स एकदा पाहाच

Apple iPhone 15 Launched: आयफोन 15 सीरिजमधले 4 मॉडेल्स एका शानदार सोहळ्यात लॉन्च करण्यात आले. आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स.  अॅपलने (Apple) या नव्या सीरिमध्ये सर्वात मोठा बदल केलाय तो म्हणजे नव्या आयफोनमध्ये USB सी टाईप पद्धतीच्या चार्जिंगचा समावेश केलाय. तेव्हा आता कोणत्याही सी टाईप चार्जिंग केबलने आणि चार्जरने आयफोन चार्ज करणं शक्य होणार आहे.. आयफोन आणि ANDROID मधला मोठा फरक आता संपुष्टात आलाय. 

आयफोन 15मध्ये कॉलदरम्यान नॉइज कॅन्सलेशन शक्य आहे. तुम्ही कोणत्याही गर्दीत असाल आणि तिथे कितीही गोंगाट असला तरी तो कॉलवर असताना ऐकू येणार नाही. त्यासाठी dynamic island फीचर्सचा समावेश करण्यात आलाय. एका छोट्या आकाराचा नॉच त्यासाठी देण्यात आलाय. हे फिचर गेल्यावर्षी आयफोन 14 प्रो सीरिजमध्ये देण्यात आलं होतं.. 

सर्वात महत्वाचं म्हणजे आयफोन 15 चा कॅमेरा शक्तीशाली आहे.  iPhone 15 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, ज्याने डिटेल्समध्ये फोटो क्लिक करता येतील. फोकस मोडमध्ये कमी प्रकाशातही चांगले फोटो काढता येतील Next Genration Portrait तसंच न्यू स्मार्ट HDR ऑप्शनचाही समावेश करण्यात आलाय

हेही वाचा :  तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या मदतीने मिनिटात मिळेल सर्व माहिती

iPhone 15 मध्ये 3D व्हिडिओही रेकॉर्ड करता येणार आहेत.  iPhone 15 मध्ये रोड साइड असिस्टंटची सुविधा सॅटेलाईटद्वारे मिळणार आहे.. तसंच iPhone 15 आणि iPhone 15 प्रो मॅक्समध्ये टायटॅनियम बॉडीचा वापर करण्यात आलाय.. तर फोनची स्क्रीन मजबूत सिरॅमिक ग्लास शील्डने सुसज्ज असेल. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे iPhone 15 ची किंमत 79 हजार 900 रुपयांपासून सुरु होतेय.. भारतात iPhone 15च्या 128 GB ची किंमत 79 हजार 900 रुपये आहे. iPhone 15च्या 256 GB ची किंमत 89 हजार 900 रुपये आहे. iPhone 15च्या 512 GB ची किंमत 1 लाख 9 हजार 900 रुपये आहे. iPhone 15 प्लसच्या 128 GB ची किंमत 89 हजार 900 रुपये आहे. iPhone 15 प्लसच्या 256 GB ची किंमत 99 हजार 900 रुपये आहे. iPhone 15 प्लसच्या 512 GB ची किंमत 1 लाख 19 हजार 900 रुपये आहे. iPhone 15 प्रोच्या 128 GB ची किंमत 1 लाख 34 हजार 900 रुपये आहे. iPhone 15 प्रोच्या 512 GB ची किंमत 1 लाख 64 हजार 900 रुपये आहे. iPhone 15 प्रोच्या 1 GB ची किंमत 1 लाख 84 हजार 900 रुपये आहे. iPhone 15 प्रो मॅक्सच्या 256 GB ची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये आहे. iPhone 15 प्रो मॅक्सच्या 512 GB ची किंमत 1 लाख 79 हजार 900 रुपये आहे तर iPhone 15 प्रो मॅक्सच्या 1 TB ची किंमत 1 लाख 99 हजार 900 रुपये आहे

हेही वाचा :  फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यानंतर 'स्विच ऑफ' येतोय का?; या सोप्या ट्रिक्सने फोनपर्यंत पोहोचता येणार

फोनची प्री ऑर्डर 15 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. तर विक्री 22 सप्टेंबरपासून सुरु होईल. म्हणजे 22 सप्टेंबरला हा फोन तुमच्या हातात मिळेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …