प्रिन्सेस डायनाला होता त्वचेचा हा गंभीर आजर, अशा घेत होत्या त्वचेची काळजी

वेल्सच्या राजघराण्यातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणजे प्रिन्सेस डायना. केवळ ब्रिटनमध्येच नाही तर जगभरातील लोकांनी त्यांना खूप पसंत केले. त्यांच्या निधनाला 25 वर्षे झाली तरी लोक त्यांची आठवण काढतात. प्रिन्सेस डायना या समाजकार्यात खूपच सक्रिय होत्या. त्याच्या ग्लॅमरमुळे लोक त्यांना ओळखाचे. तिच्या नितळ त्वचेची चर्चा नेहमीच सर्वत्र होत असते. नितळ त्वचेचे रहस्य सर्वांसमोर आले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की प्रिन्सेस डायना त्वचेच्या एका आजाराने ग्रस्त होत्या. यामुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्समुळे चेहऱ्यावर सूज आणि छोटे पिंपल्स राहणे या गोष्टी होत होत्या. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या सुंदर त्वचेने सर्वांचे मन मोहणाऱ्या प्रिन्सेस डायनाला नक्की कोणता आजार होता. हा आजार कसा असते. त्या आजाराबद्द्ल सर्व काही जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

​त्वचेच्या या समस्येने त्रस्त

तथापि, तुम्हाला माहित आहे का प्रिन्सेस डायना या त्वचेच्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. हा आजर म्हणजे रोसेसिया. ज्यामध्ये त्वचा लाल होते आणि लहान मुरुम देखील दिसतात.1992 मध्ये प्रिन्स चार्ल्स पासून विभक्त झाल्यानंतर, डायनाच्या लालित्य आणि सौंदर्याची जगभर चर्चा झाली.

हेही वाचा :  Uddhav Thackeray : 'जे आमच्यासोबत झालं ते RSS सोबत...' ; पालिकेतील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा

(वाचा :- वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीतील वाटाल, बाबा रामदेव सांगितले हेल्दी त्वचेचे रहस्य)

​रोसेसिया म्हणजे काय

ही एक त्वचेची स्थिती आहे जी बऱ्याच काळासाठी त्रास देते, विशेषतः चेहरा. या पिंपल्समुळे चेहऱ्यावर सूज आणि छोटे पिंपल्स राहतात. याचा जास्त काळासाठी परिणाम दिसून येतात.

(वाचा :- नितळ त्वचेसाठी बाबा रामदेव यांनी दिला जालिम उपाय, महिन्याभरात येईल झटपट रिझल्ट)

​त्वचेची विशेष काळजी घेतली

डायना आपल्या त्वचेबाबत खूप जागरूक होती. तिची मेकअप आर्टिस्ट मेरी ग्रीनवेलने सांगितले होते की, ती नेहमी झोपण्यापूर्वी मेकअप काढायची, चेहरा स्वच्छ करायची. तसेच मेकअप करण्यापूर्वी ती चेहरा स्वच्छ करायची.

(वाचा :- वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीतील वाटाल, बाबा रामदेव सांगितले हेल्दी त्वचेचे रहस्य)

​हा होता स्किन केअर रूटीन

ग्रीनवेलच्या म्हणण्यानुसार, प्रिन्सेस डायनाने दिवसातून दोनदा क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग पथ्ये पाळली. सीरमसोबत सनब्लॉक देखील वापरायच्या. एवढं असूनही प्रिन्सेंस डायना खूपच सुंदर दिसायच्या.

(वाचा :- टाचांना पडलेल्या भेगांमुळे त्रस्त आहात? मधुमेहींनी अधिक काळजी घेण्याची गरज, या 3 गोष्टींनी 7 दिवसात मिळवा मुलायम टाचा)

हेही वाचा :  बापरे! Valet Driver ने पार्किंग करताना अब्जाधीशाच्या दोन्ही Lamborghini ठोकल्या, त्यानंतर जे काही झालं...; पाहा VIDEO

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …