Supriya Sule : सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेत आवडला होता ‘हा’ अभिनेता; त्याला हळूच मेसेज केला आणि…

Supriya Sule Mirzapur Web Series : राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आणि अनेकांनाच त्याचा हेवा वाटला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या इथपासून ते एक यशस्वी महिला खासदार अशी त्यांची ओळख आणि यादरम्यानचा प्रवास अनेकांनी पाहिला. या प्रवासात बरेच नेते त्यांच्या जोडीनंही मोठे झाले. अशा या राजकीय नेतेमंडळींची एक वेगळी बाजूही कायम रंजक असते. सुप्रिया सुळे यांचंही कधीही न पाहिलेलं रुप नुकतंच सर्वांसमोर आलं आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

राजकारणात रमणाऱ्या सुप्रिया सुळे यांना आवडत्या चित्रपटाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी आपण पाहिलेल्या ‘मिर्झापूर’ (Mirzapur) या वेब सीरिजचं नाव घेत अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. 

सीरिज पाहिल्यानंतर कालिन भैय्या (Kalin Bhaiiya) साकारणाऱ्या पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेला पाहून त्या इतक्या भारावल्या की अभिनेत्याला थेट मेसेजही केला. मित्रमंडळींकडूनच त्यांना पंतज यांचा फोन नंबर मिळाला होता. शेवटी एके दिवशी मोकळा वेळ मिळाला आणि त्यांनी पंकज यांना थेट मेसेज केला. आपल्याशी बोलण्यासाठीचा योग्य वेळ काय? असा तो मेसेज होता. 

हेही वाचा :  Railway News: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा

आपल्या आवडीच्या अभिनेत्याविषयी बोलताना त्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलींना त्यांच्या आवडीची गोष्ट गवसावी असाच. 

तुम्ही अप्रतिम अभिनय केला असं पुढे सुप्रिया सुळे पंकज त्रिपाठी यांना म्हणाल्या. तो क्षण सुप्रिया यांच्यासाठी अविस्मरणीयच होता. ही प्रशंसा ऐकल्यानंतर त्रिपाठी यांनीसुद्धा त्यांच्या अंदाजातच आभार व्यक्त केले. ‘मी बारामतीला येऊन गेलोय’, असंही ते म्हणाले आणि सुप्रिया सुळे यांचे डोळे चमकले.  

Mirzapur 3 big UPDATE: Kaleen bhaiya aka Pankaj Tripathi spills the beans!  | Web Series News | Zee News

‘अरेच्छा तुम्ही बारामतीला येऊन गेलात आणि मला ठाऊकही नाही…’, अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. यावर ‘मी बारामती, फलटण, साताराला गेलेलो आणि असं म्हणता म्हणाता ते आपण नक्की भेटू असं आश्वासनच त्रिपाठी यांनी सुप्रिया सुळे यांना दिलं. यावेळी एक नेता नव्हे, तर सुप्रिया सुळे यांच्यातली चाहती आनंदानं हुरळून गेली होती. आपल्या आयुष्यात हा Fan Moment होता, असंही त्या म्हणाल्या.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …