Tag Archives: Latest marathi News

मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, ‘सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी…’

Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज ठाकरेंनी ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) एक पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण …

Read More »

‘देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण…’, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी!

Prithviraj Chavan On devendra fadnavis : जालनामध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha  Reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गालगोट लागल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला अन् राज्यभर खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यभरात याचे पडसाद उमटत असल्याचं दिसतंय. तर राजकीय वर्तुळात देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून माजी मुख्यमंत्री …

Read More »

मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

Today News In Marathi:  रक्षाबंधन हा सण पवित्र नात्याचा आणि आनंदाचा असतो. या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला ओवाळून राखी बांधते. तर, भाऊही बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. आनंद घेऊन येणारा सण मात्र एका कुटुंबाच्या वाट्याला आभाळाऐवढं दुखः घेऊन आला आहे. उत्तर प्रदेश येथील हरदोई जिल्ह्यातील कायमपुर गावात राहणाऱ्या एका कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सणाच्या दिवशी मुलांची एक छोटीशी इच्छा पूर्ण …

Read More »

Maharastra Politics : ‘त्यादिवशी मला फोन आला अन्…’, जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!

Chhagan Bhujbal vs Jitendra Awhad : ‘अब्दुल करीम तेलगी’ हे नाव सर्वांनाच माहित असेल. लोकांची फसवणूक करून ज्याने मोठं साम्राज्य उभं केलं, हाच तो अब्दुल करीम तेलगी… संपूर्ण भारताला हादरवून सोडणाऱ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर ‘स्कॅम 2003’ (Scam 2003) नावाची नवी वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या तेलगी स्कॅमविषयी (Telgi Scam) चर्चा होताना दिसत आहे. याच तेलगी प्रकरणावरून छगन भुजबळ (Chhagan …

Read More »

Viral Video : तुरुंगातील 40 फूट भिंतीवरून मारली उडी अन् कैद्याने लंगडत लंगडत ठोकली धूम; घटना CCTV मध्ये कैद!

Rape Accused Escape Karnataka Jail : चित्रपटांमध्ये खासकरून साऊथच्या सिनेमांमध्ये कैदी जेलची सेक्युरीटी तोडून पळून जातात, असं अनेकदा दाखवण्यात येतं. मात्र, वस्तुस्थितीत असं फार क्वचित पहायला मिळतं. सध्या टेकनॉलॉजीच्या काळात चोरांना कधी काय सुचेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील जेलमध्ये पहायला मिळालाय. एका कैद्याने 40 फूट उंचीची भिंत पार करून थेट पलायन केलंय. त्याचा व्हिडीओ आता सीसीटीव्हीमध्ये कैद …

Read More »

Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!

Rohit pawar On Onion Price: कांद्याचं निर्यात शुल्क 40 टक्के केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. नाशिक, पुणे, अहमदनगर याचबरोबर राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर केंद्र सरकार नाफेड मार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. 2410 रुपये प्रति क्विंटल भावाने ही कांदा खरेदी करण्यात येईल. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य …

Read More »

Chandrayaan 3 : चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी इस्लामिक सेंटरमध्ये मुलांचं नमाज पठण; पाहा Video

Chandrayaan-3 landing Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान-3 ( Chandrayaan-3 ) आता अंतिम टप्प्यात आहे. जुलै महिन्यात चांद्रयान अवकाशात पाठवलं होतं. त्यानंतर आता चांद्रयानावरच सर्वांच्या नजरा खिळल्याचं पहायला मिळतंय. अवघ्या काही तासात आता चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर लँड (Chandrayaan-3 landing) करेल. मात्र, हे लँडिंग सोपं असणार नाही. इस्त्रो (ISRO) सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार असल्याने मोहिमेला …

Read More »

Chandrayaan-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणं अवघड का असतं? ISRO चे माजी चीफ म्हणतात…

Chandrayaan-3 Landing On Moon: सर्वांना उत्सुकता लागलेली चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या 23  ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Chandrayaan-3 Landing Update) करणार आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अर्थातच इस्त्रोने ही वेळ जाहीर केलीये. मात्र, परिस्थितीनुसार लँडिंगचा मुहूर्त पुढं ढकलण्याची शक्यता आहे. …

Read More »

Onion Price : शेतकऱ्यांना कांदा रडवणार; केंद्र सरकारकडून 40 टक्के निर्यात शुल्क लागू

Export Duty On Onions: देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा सुधारण्यासाठी आणि भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लागू केले. 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे निर्यात शुल्क लागू असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगल्या भावाला मुकावं लागेल. तर सामान्य बाजारात कांद्याच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच आता …

Read More »

नितीन गडकरी म्हणतात जुने गिऱ्हाईक दिसेना, रोहित पवारांना शंका, म्हणाले ‘हा कट तर नाही ना?’

Rohit Pawar On Nitin Gadkari: कॅगच्या अहवाल समोर आल्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. केंद्र सरकारच्या सहा योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालात (CAG Reports) नमूद करण्यात आलं आहे. तर कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यांवर देखील आरोप करत ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे आता नितीन गडकरी (Nitin Gadkari) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. नितीन गडकरी यांचं राजकारण संपवायचं हा …

Read More »

Maharastra Politics: शरद पवार भाजपसोबत जाणार? अजित पवारांसोबतच्या ‘गुप्त’ बैठकीवर म्हणाले…

Sharad Pawar on Ajit pawar meeting: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून आलं होतं. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली. त्यानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार माझा पुतण्या …

Read More »

META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा

META Breach of Privacy: फेसबुक म्हणजेच मेटाचे भारतात कोट्यावधी यूजर्स आहेत. देशासह जगभरात फेसबुक यूजर्सची संख्या वाढत आहे. यूजर्स दिवसभर मेटाद्वारे आपल्या जवळच्यांशी संवाद साधत असतात. यावेळी त्यांच्या गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित होत असतो. गोपनीयतेच्या प्रश्नावरुन मेटावर जगभरातून टिका होत असते. दरम्यान आता नॉर्वेने यावर कडक कारवाई केली आहे.  गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल मेटाला दररोज 1 दशलक्ष इतका दंड आकारला जाणार …

Read More »

काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं… मला बी … अजित पवार धनगरी वेशात

Ajit Pawar in Jejuri :  जेजुरीत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आगळ्या रुपाची चर्चा पाहायला मिळाली. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजित पवार यांना पारंपरिक पगडीही परिधान करण्यात आली. मात्र, कार्यक्रमाला जाताना अजित पवारांनी आपली हीच वेषभूषा कायम ठेवली. हातातली काठी वाजवतच त्यांनी जेजुरी गड उतरला. त्यांच्या या वेषभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतल. येळकोट …

Read More »

युनिवर्सिटी कॅम्पसमध्ये घुसली वाघीण, कोण बेडखाली लपलं तर कोण कपाटावर; पाहा Video

Tigress T-123 Entered The University Campus: मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने आता सिमेंटच्या जंगलात जंगली प्राण्यांचा वावर वाढलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. अशातच आता मध्य प्रदेशमधून (Madhya Paradesh News) धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) अनेकदा रस्त्यावरून जाताना लोकांना वाघ दिसतो. गेल्या दिवशी एका खासगी विद्यापीठात (University Campus) एका …

Read More »

Pune News: ना आयआयटी झालं ना इंजिनियरिंग; Google ने पुण्याच्या पठ्ठ्याला दिला डोळे गरगरणारा पगार!

Harshal Juikar Google Job: गुगलसारख्या मोठ्या मल्टीस्टार कंपनीमध्ये काम करावं, असं कोणाला वाटत नसेल. अनेकजण डोळे उघडे ठेऊन सिलिकॉन व्हॅलीमध्ये करियर सेट करण्याची स्वप्न अनेकजण पाहत असतात. मात्र, परिश्रम घेऊन देखील अनेकांना मुक्काम गाठता येत नाही. मात्र, अशातच पुण्यातील (Pune News) एका तरुणाचं नशिब चमकलं आहे. पुण्यातील विद्यार्थी हर्षल जुईकर (Harshal Juikar) याने कमी वयातच गुगलकडून 50 लाख रुपयांचे प्रभावी …

Read More »

Maharastra Politics: ‘महाराष्ट्रात खपवून घेणार नाही…’, प्रबोधनकारांचा दाखला देत मनसेची शिरसाटांवर सडकून टीका!

MNS criticizes Sanjay Shirsat: शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chartuvedi) यांच्यावर टीका केली होती. ही टीका करताना संजय शिरसाट यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्या सौंदर्यामुळे राजकारणात पुढे गेल्या, असं वक्तव्य केलं. हे बोलत असताना शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर आरोप प्रत्यारोपांनी जोर धरलाय. …

Read More »

सावधान! पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय 52 फूट लघुग्रह, नासाने दिला इशारा

Earth Orbit: नासाने पृथ्वीच्या दिशेने जाणारा लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे 2019 ते 2023 या कालावधीत हा लघुग्रह पाचव्यांदा पृथ्वीच्या दिशेने येत आहे. अॅस्टरॉइड (Asteroid 2020 PP1) नावाचा हा लघुग्रह येत्या ४८ तासांत पृथ्वीच्या जवळ पोहोचणार  असल्याचे सांगण्यात येत आहे. हा लघुग्रह ताशी 14,400 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. त्याचा आकार 52 फूट आहे. नासाचा हा लघुग्रह …

Read More »

या ‘नाच्या’मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली :  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) दिल्लीतील जंतर मंतर इथं अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे एक दिवसीय सांकेतिक उपोषण करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील महिलांनी या उपोषणात सहभाग घेतला.  उपोषणस्थळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार असल्याचं आश्वासन खासदार …

Read More »

ऑगस्टमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद; आतच पाहून घ्या ‘बँक हॉलिडे’ची यादी

Bank Holiday in August 2023 : ‘तुम्हाला काय… सगळ्या सुट्ट्या मिळतात’, असं म्हणत तुम्हीही अनेकदा एखाद्या ओळखीतल्या आणि त्यातही बँकेत काम करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून असं काहीतरी म्हटलं असेल. आता तर, तुम्हाला असं म्हणायला निमित्तच मिळणार आहे. कारण, येत्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात बँकांना साधारण 14 ते 15 दिवसांची सुट्टी असणार आहे. त्यामुळं तुमचीही बँकांशी संबंधीत काही कामं असल्यास आताच ती …

Read More »

मणिपूर घटनेवर अण्णा हजारे यांना संताप अनावर, म्हणाले ‘अशा नराधमांना…’; पाहा Video

Anna Hazare On Manipur: दोन दिवसांपूर्वी व्हायरल (Manipur Video) झालेल्या एका व्हिडीओमुळे देश हादरुन गेला होता. दोन तरुणींना नग्न फिरवून त्यांचा विनयभंग केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. मात्र, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हिंसाचाराच्या प्रकरणात मौन बाळगलं आहे. अशातच आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते …

Read More »