Tag Archives: भारत

भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीपेक्षा मच्छरामुळे बसतो मोठा फटका; आकडेवारी करेल थक्क

Mosquito bite : जागतिक आर्थिक मंदीचं संकट सध्या फोफावताना दिसत असून, अनेकांनाच या संकटामुळं फटका बसताना दिसत आहे. कैक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरकपातीची लाट आलेली असतानाच जिथं एकिकडे देशापुढे हे आर्थिक संकट मोठं होत आहे तिथं दुसरीकडे लहानसा मच्छरही देशाच्या संकटात भर टाकताना दिसत आहे. कारण, मच्छर चावल्यामुळं होणाऱ्या झोपमोडीचे थेट परिणाम निम्म्याहून अधिक भारतीयांच्या उत्पादनक्षमतेवर होताना दिसत आहे. गुडनाइटने केलेल्या …

Read More »

Viral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक

Viral News : चित्रपटातून तर कधी पार्टीतून तुम्ही पटियाला पेगबद्दल ऐकले असालच. तुम्ही मद्यपान करता किंवा नाही तरी पटियाला पेग हे नाव नक्कीच कधी ना कधी कानावर पडलंच असेल. हे नाव कुठून आलं आणि या पेगला पटियाला पेग का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? पंजाब, दिल्ली, चदिगढ या शहरामध्ये हे नाव हमखास ऐकायला मिळतं. मद्यपान करणारे लोक म्हणतात की पटियाला पेग …

Read More »

धोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण ‘या’ हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला

Business News : देशाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये भक्कम झाली असून, त्या अनुषंगानं देशाचा आर्थिक विकासही सकारात्मक वाटेनं सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. आकडेवारी आणि वस्तुस्थिती हेच दर्शवत आहे. पण, असं असतानाच खिशात येणारी रक्कम, अर्थात कामाचा मिळणारा मोबदला किंवा मिळणारा पैसा काही केल्या पुरत नाही आणि उरतही नाही असा सूर आळवणारेही अनेक भारतीय आहेत. इथंही उभा राहणारा एक महत्त्वाचा …

Read More »

तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी

Tech News : दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर आता इतका सर्रास झाला आहे, की हल्ली अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच मोबाईल (Mobile) हीसुद्धा अनेकांचीच मूलभूत गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा रस्त्यानं चालताना, एखाद्या ठिकाणी प्रवास करताना किंवा मग अगदी काहीही न करता घरात बसलेलं असतानाही बरीच मंडळी शांत बसलेली दिसत नाही. साधारण वयोवृद्ध पिढी वगळली तर, उरलेल्या …

Read More »

‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या एनएफएआय या प्रतिष्ठित चित्रपट संवर्धन संस्थेत प्रभास चंद्रा लिखील आणि दिग्दर्शित ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकुर असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी राडा घातला आहे. समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याची माहिती उघड झाली आहे.  चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा …

Read More »

मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला …

Read More »

पाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!

USA role In air strikes in Pakistan : मंगळवारी जागतिक स्तरावर मोठी घडामोड घडली. इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला अन् संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. बलुच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन असल्याने अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचा पोकळ दावा पाकिस्तानने केलाय. इराण हा …

Read More »

ऑनर किलिंगने देश हादरला! गावातील चिंचेच्या झाडाला बापानेच मुलीला लटकवलं, दोर तोडला ती वाचली पण…

Honour Killing :  देशाला हादरवणारी आणखी एक ऑनर किलिंगची घटना घडली असून, यावेळी आई- वडिलांनी पोटच्या मुलीला तिनं अनुसूचित जमातीतील तरुणाला जोडीदार म्हणून निवडल्याचा आकस मानात ठेवत सूडभावनेनं तिला संपवण्याचं क्रूर कृत्य केलं.  कुठे घडली नात्यांला काळीमा फासणारी घटना? तामिळनाडूतील तंजावर येथे अनुसूचित जातींमधील मुलाशी लग्न केलं म्हणून आईवडिलांनीच पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली. बीबीसीच्या वृत्तानुसार पूवालूर गावातील नवीन नावाच्या …

Read More »

EaseMyTrip नंतर आणखी एका भारतीय कंपनीचा मालदीवला दणका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्याने भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून, ही मोहीम दिवसेंदिवस भव्य रुप घेत आहे. सोशल मीडियावर  #BoycottMaldives ट्रेंड सुरु असून, भारतीय यावरुन आपली मतं मांडत आहेत. EaseMyTrip या कंपनीने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट्सचं बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली असताना आता InsuranceDekho कंपनीनेही बहिष्कार टाकला आहे. ऑनलाइन इन्शुरन्स कंपनी InsuranceDekho ने प्रवास विमा सेवा निलंबित …

Read More »

नव्या वर्षाआधी नवं संकट? उत्तराखंड- हिमाचलमध्ये डोंगरकडे खचण्याची भीती, प्रशासनाकडून अलर्ट जारी

Uttarakhand-Himachal Pradesh: नाताळ (Christmas) आणि वर्षाचा शेवट (Year End 2023) असा बेत साधून अनेकांनाच सलग सुट्ट्या मिळतात आणि या सुट्ट्या घरात बसून व्यर्थ जायला नकोत म्हणून मग भटकंतीसाठी एखाद्या कमाल ठिकाणी जायचे बेत आखले जातात. यंदाच्या वर्षीसुद्धा अनेकांनीच या भटकंतीसाठी (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड (Uttarakhand) आणि काश्मीरसारख्या (Kashmir) थंड हवेच्या ठिकाणांना पसंती दिली आणि आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी, सरत्या …

Read More »

भारत-पाकिस्तानदरम्यान कोणती सीमा आहे? परीक्षेत विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थ्याचं उत्तर वाचून शिक्षक कोमात

India-Pak Border : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या असाच एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो राजस्थानमधल्या (Rajashtan) एका सरकारी शाळेतील 12 इयत्तेच्या परीक्षेचा आहे. राजनिती शास्त्रच्या या पेपरमध्ये प्रत्येकी दोन मार्कांच्या प्रश्नांची उत्तर लिहिली आहेत. यातला पहिला प्रश्न आहे. कारगिल युद्ध कधी आणि कोणत्या देशांमध्ये झालं होतं. तर दुसरा प्रश्न होता भारत-पाकिस्तान …

Read More »

भारतातून ‘लाल सोनं’ नामशेष होणार? भीतीदायक वास्तव समोर

Red Gold in India: भारतात सोन्याचे भाव दर दिवशी बदलतात आणि ते खरेदी करण्यासाठीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची चिंता वाढवतात किंवा मग कमी करतात. अशा या सोन्याच्या दरांची चिंता होत असतानाच आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आला असून, त्या मुद्द्यानं अनेकांनाच पेचात पाडलं आहे. कारण, एका अहवालातून आणि काही निरीक्षणांतून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातून ‘लाल सोनं’ नामशेष होण्याच्या मार्गावर चाललं आहे.  लाल …

Read More »

अंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!

China Space Station: अवकाशातील अनेक गोष्टींबाबत संशोधन करण्यासाठी भारत, रशिया, अमेरिका, चीन या देशांकडून सातत्यानं विविध मोहिमा राबवण्यात येतात. अशा या मोहिमांच्या माध्यमातून अवकाशासंदर्भातील अनेक गुपितं अगदी सोप्या पद्धतीनं आपल्या समोर आली आहेत आणि यापुढंही येत राहतील. त्यातच आता काही अशी दृश्य आणि अशी माहिती समोर येत आहे की पाहणारेही थक्क झाले आहेत.  नेमकं काय घडलंय?  पुन्हा एकदा अवकाश आणि …

Read More »

भारतातील ‘या’ गावात नाही चालत सरकारचे नियम; इथं मिळतो वेगळ्याच दुनियेचा अनुभव

Travel News : सध्याची पिढी प्रवासाला प्राधान्य देणारी आहे. पण, या पिढीपर्यंत प्रवासाचं महत्त्वं पोहोचवणाऱ्या जुन्या पिढीतील मंडळींनीही अशा काही ठिकाणांची माहिती आपल्यापर्यंत आणली जी पाहून आपण अवाक् झालो. भारतातही अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे (Himachal Pradesh) हिमालच प्रदेशातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं एक गाव. एक असं गाव जिथं गेलं असता तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत आहात याचीच अनुभूती तुम्हाला …

Read More »

भारतासाठी गेम चेंजर ठरणार ‘या’ 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच

India Space Economy : चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्यामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक देश भारताच्या इस्रो या अंतराळ संस्थेच्या मदतीने अनेक उपग्रह लाँच करत आहेत. यामुळे भारताच्या  स्पेस इकॉनॉमीने देखील भरारी घेतली आहे. मात्र, आगामी 5 अंतराळ मोहिमांवर भारताची 44 बिलियन डॉलरची स्पेस इकॉनॉमी अवलंबून आहे.  एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम चांद्रयान …

Read More »

‘तुमचे 41 राजदूत माघारी बोलवा, अन्यथा…’; भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; ट्रुडो सरकारला जोरदार दणका

खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूनंतर भारत आणि कॅनडा सरकारमधील संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला असून, याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भारताने आता कॅनडाला मोठा झटका दिला आहे. भारताने कॅनडाला त्यांचे 41 राजदूत माघारी बोलवण्यास सांगितलं आहे. Financial Times ने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत राजदूत माघारी बोलवा असं सांगितलं …

Read More »

Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

Tamil Nadu Nilgiris Coonoor Bus Accident : तामिळनाडूमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर आली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस 100 फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी होती. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जाताना ही दुदैवी घटना घडली आहे. या अपघात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार …

Read More »

एकदोन नव्हे, तब्ब 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?

Millionaires Left India: नोकरीच्या निमित्तानं (job opportunities) किंवा शिक्षणाच्या (Education) निमित्तानं अनेकांनीच परदेशांना पसंती दिल्याचं आपण पाहिलं आहे. किंबहुना आपल्या ओळखीत किंवा कुटुंबातच अशी एखादी तरी व्यक्ती असते जी या कारणांसाठी परदेशवारीवर असते. ही व्यक्ती मायदेशी परतली की, तिच्याभोवती कुतूहलानं होणारा गराडाही आपण पाहिला असेल. पण, देशात परतणार नसलेल्यांचं काय? विचारात पडलात ना? मुळात स्वत:चा देश सोडून एका वेगळ्या देशात …

Read More »

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

What is Khalistan? : भारत आणि कॅनडा (India vs Canada ) या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु झालेला वाद आता अतिशय गंभीर वळणावर आला असून, दोन्ही राष्ट्रांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देशाच्या संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला होता. …

Read More »

खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय, पाकिस्तानचा पाठिंबा… भारताचा गंभीर आरोप

India Canada: कॅनाडात गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरोधात खलिस्तानी (Khalistani) आक्रमक झालेत. खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ले केले. भारताविरोधात मोर्चे काढले. मात्र कॅनडातील (Canada) जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) सरकारनं कोणतीही कारवाई केलेली नाही. यालट खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर तिथल्या सरकारनं भारतावर बेछूट आरोप सुरू केलेत. त्यामुळे भारत आणि कॅनडामधील तणाव प्रचंड वाढलाय. वाढत्या तणावावर भारताच्या परराष्ट्र खात्याने पत्रकार परिषद घेत कॅनडाच्या आरोपांना चोख …

Read More »