पाकिस्तानवर झालेल्या एयरस्ट्राईकमध्ये अमेरिकेचा हात? इराणच्या कारवाईनंतर US ने दिला कडक इशारा!

USA role In air strikes in Pakistan : मंगळवारी जागतिक स्तरावर मोठी घडामोड घडली. इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला अन् संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. बलुच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन असल्याने अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचा पोकळ दावा पाकिस्तानने केलाय. इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे, तर पाकिस्तान हा सुन्नी आहे. यावरुनही त्यांच्यात वाद आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता होताना दिसत आहे. अशातच आता अमेरिकेने या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलंय.

अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारची राजनैतिक चर्चा झालीये का? किंवा इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याबाबत पाकिस्तानकडून काही प्रकारच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या, असा सवाल जेव्हा अमेरिकेचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. ‘इराण आणि अमेरिकेमध्ये असं कोणतंही विशिष्ट संभाषण झालं नाही.’ मध्यपूर्वेतील संकट संपवण्यासाठी अमेरिका कितपत सहभागी आहे? यावर बोलणं मिलर यांनी टाळलं. ‘काय होऊ शकते किंवा काय होऊ शकत नाही यावर मला बोलायचे नाही. अमेरिकेला मध्यपूर्वेत शांतता आणि सुरक्षा कायम ठेवायची आहे.’, असं म्हणत त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा :  पोटावर झोपल्याने चेहऱ्यावर येतात पिंपल्स, तुमच्या या वाईट सवयींनी चेहरा मुरुमांनी भरतो

नुकसान कोणाचं? मॅथ्यू मिलर म्हणतात…

पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला तर ते कोणाच्याही हिताचं असणार नाही. अमेरिका परदेशी भूमीवर आपल्या लोकांचे संरक्षण करत राहील, असं मॅथ्यू म्हणतात. इराणने हुथी बंडखोरांना पाठिंबा दिल्याने अमेरिका इराणवर नाराज असल्याचं दिसून येतंय. हुथी बंडखोर रेड समुद्रातील व्यावसायिक जहाजांना सतत लक्ष्य करत असल्यानं मॅथ्यू यांनी आपली बाजू मांडली. आम्ही या हल्ल्यांचा निषेध करतो. गेल्या काही दिवसांत इराण आपल्या शेजारी देशांच्या सार्वभौम सीमेचे उल्लंघन करत असल्याचं आपण पाहिलं आहे, असं म्हणत मॅथ्यू यांनी निशाणा साधलाय. एकीकडे, इराण हा मध्यपूर्वेतील दहशतवादासाठी निधीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

इराणचं स्पष्टीकरण

पाकिस्तानच्या निषेधानंतर इराणने या हल्ल्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन म्हणाले, आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या एका दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्याचा आणि गाझामधील युद्धाचा काहीही संबंध नाही. आम्ही केवळ जैश-अल-अदलच्या तळांवर हल्ला केला. या दहशतवाद्यांनी इराणमध्ये आमच्याविरोधात काही दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या. यांच्या हल्ल्यात आमचे जवान शहीद झाले होते, असं अमीर अब्दुल्लाहियन यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  शरद पवारांशिवाय मोदींसमोर सक्षम पर्याय नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …