पोटावर झोपल्याने चेहऱ्यावर येतात पिंपल्स, तुमच्या या वाईट सवयींनी चेहरा मुरुमांनी भरतो

एखादं महत्त्वाचे प्रेझेंटेशन असो किंवा एखादा मोठा कार्यक्रम उपस्थित राहण्यासाठी असो या दिवशी चेहऱ्यावर आलेल्या एका डागाने किंवा पिंपलने तुमचा मूड खराब होऊ शकतो. चेहऱ्यावर मुरुमे येण्यासाठी रसायनांचा वापर,आहारात झालेले बदल, वातावरणातील बदल या गोष्टींचा थेट परिणाम होत असतो. पण अशात आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या त्वचेच्या स्थितीवर परिणाम होतो आणि प्रत्यक्षात मुरुम होऊ शकतात. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं. तुमच्या झोपण्याच्या काही सवयींचा त्वचेवर थेट परिणाम होतो. रात्रीचा काळ हा शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाचा मनला जातो. अशात जर तुम्ही या काळात काही चुका केल्यात तर त्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर सुद्धा होऊ शकतो. यासाठी टेंडर स्किन इंटरनॅशनलच्या संस्थापका सेलिब्रिटी डर्मेटोलॉजिस्ट डॉ. सोनिया टेकचंदानी यांनी काही कारणे सांगितली आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या सवयी. (फोटो सौजन्य: istock)

​उशीचे कव्हर न बदलणे

जसे वापरलेले कपडे धुणे हा तुमच्या कामाचा एक भाग आहे, तसेच उशीचे कव्हर नियमितपणे धुणे आणि बदलणे देखील अत्यंत आवश्यक आहे. पिलो कव्हर्स धूळ एक थर जमा होतो. आपण आपला चेहरा उशाच्या कव्हरवर ठेवतो, आणि कव्हरवर असलेले बॅक्टेरिया त्वचेवर येतात. त्यामुळे मुरुमांपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून एकदा उशाचे कव्हर बदलण्याची खात्री करा.

हेही वाचा :  Sana Khan 24 Carat gold tea : जगातील सर्वाधिक उंचीवरील बुर्ज खलिफामध्ये सना खानने चाखला २४ कॅरेट Gold Tea चा स्वाद, हेच तर नाही तिच्या सौंदर्याचं रहस्य?

​मेकअप करून झोपणे

रात्री उशिरा बाहेरुन आल्यावर आपण बेडवर पडतो. पण यावेळी मेकअप चेहऱ्यावर तसाच राहतो. ही गोष्ट अत्यंत हानिकारक ठरू शकते. मेकअप तसाच ठेवल्याने त्वचेचे छिद्र बंद राहतात त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे तुम्ही कितीही थकलेले असलात तरी, मेकअप स्वच्छ करा. त्यासाठी सौम्य मेकअप रिमूव्हर वापरा करा.

​पोटावर झोपणे

हे थोडे विचित्र वाटेल पण पोटावर झोपल्याने पुरळ होऊ शकते. जेव्हा तुम्ही अशा स्थितीत झोपता तेव्हा तुमची त्वचा उशीच्या कव्हरच्या थेट संपर्कात असते आणि तुमची त्वचा आणि उशाच्या आवरणामध्ये रात्रभर घर्षण होते. म्हणून, जर तुम्हाला पुरळ टाळायचे असेल तर पोटावर झोपणे टाळण्याचा प्रयत्न करा. (वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)

​रात्रभर केसांना तेल वापरणे

हेअर ऑइल केसांसाठी उत्तम आहे, परंतु ते तुमच्या त्वचेवर दुष्परिणाम करू शकतात. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी केसांना तेल लावून झोपू नये कारण तेल रात्रीतून बाहेर पडते आणि जास्त सीबममुळे त्वचेवर मुरुम होतात. जर तुम्हाला तुमच्या केसांचे पोषण करायचे असेल तर गरम तेलाने मसाज करा आणि शॅम्पू करण्यापूर्वी दोन तास ठेवा. (वाचा :- त्वचेच्या आरोग्यासाठी आणि घनदाट केसांची काळजी घेण्यासाठी 4 गोष्टींनी बनलेले हे डिटॉक्स ड्रिंक नक्की ट्राय करा)

हेही वाचा :  किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...

​चेहरा नीट साफ करा

तुमच्या त्वचेवर दिवसभर खूप घाण साचते. तुमचे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि प्रदूषण तुमचे छिद्र बंद करू शकतात आणि मुरुमांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी फेसवॉश वापरणे आवश्यक आहे. तसेच, त्वचेवर फेसवॉश लावण्यापूर्वी नेहमी आपले हात व्यवस्थित धुवा. मुरुमांपासून बचाव करण्यासाठी दुहेरी साफ करण्याच्या पद्धती खूप उपयुक्त आहेत. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

​गलिच्छ टॉवेलने चेहरा पुसणे

तुम्ही तुमच्या त्वचेसाठी अनेक उत्पादने वापरा पण अशात जर तुम्ही तुमच्या त्वचेवर घाणेरडा टॉवेल किंवा वॉशक्लोथ वापरल्यास, त्यामुळे मुरुम होतात. मुरुम टाळण्यासाठी टॉवेल किंवा वॉशक्लोथ नियमितपणे धुतले पाहिजेत. (वाचा :- Hair Loss : पुरुषांच्या 6 गंभीर चुकांमुळे केस गळतात, कमी वयातच पडते टक्कल )

(टिप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. तो कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …