Nysa Devgan: तोडक्या-मोडक्या हिंदीतून भाषण केल्याने न्यासा देवगन ट्रोल, पण समाजकार्यातून उमटवली

Nysa Devgan: बॉलिवूड स्टार कपल अजय देवगन (Ajay Devgan)आणि काजोलची (Kajol)लाडकी लेक न्यासा देवगन (Nyasa Deevgan) अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ती आतापर्यंत सर्वात जास्त चर्चेत असणारी स्टार किड्सपैकी एक आहे. कधी बदललेल्या लूकमुळे, कधी फोटोमुळे तर कधी स्टायलिश कपड्यांमुळे नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. अहमदनगरमधील एका कार्यक्रमात न्यासाने तोडक्या मोडक्या हिंदीतून भाषण केल्याने ती ट्रोल झाली. पण त्याचवेळी न्यासाने एनवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या कामाची छाप मात्र यावेळी उमटवली.  

अहमदनगरच्या ग्रामीण भागात एनवाय (NY Foundation) फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला न्यासाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले आहे. या कार्यक्रमात तिने खूप तोडके-मोडके हिंदी भाषण करत मुलांना शिक्षणाबद्दलचे महत्व सांगितले. तिच्या हिंदीमुळे आता ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

Nyasa Devgan Speech: हिंदीतून भाषण करताना न्यासा अडखळली 

न्यासा आपल्या भाषणात खूपदा अडखळल्याची दिसून आली. भाषण करताना ती एकच शब्द अनेकदा बोलताना दिसते आहे. शाळकरी मुलांना हिंदीतून अभ्यासाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करुन देताना तिला शब्द सुचेनासे झाले. तिचा भाषणाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिची खिल्ली उडवली. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यातील एकजण म्हणतो विदेशात राहून इंग्रजी शिकली परंतु भारतात राहून साधं हिंदी बोलता येत नाही.

हेही वाचा :  आई-बहिणीच्या बाजूला बसलेला 'हा' चिमुरडा कोण आहे? ओळखलात का?

अजय देवगनच्या सोशल-वर्क विंग एनवाय फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याची मुलगी न्यासाने हजरी लावली. यावेळी न्यासा पारंपारिक ड्रेसमध्ये दिसली. तिने पिवळा सलवार सूट घातला होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ती उत्साहित आणि आनंदी दिसते आहे. न्यासा पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाखातील महिला आणि पुरुषांसोबत फोटो देतानाही दिसत आहे.

NY Foundation: एनवाय फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य

न्यासाने डिजिटल लायब्ररी उघडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच तिने शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि खेळण्यांच्या किटचे वाटप केले. न्यासाने 200 हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचा अभ्यास आणि क्रीडा उपक्रमांकडे असलेला कल पाहून न्यासा भारावून गेली.

अजय देवगणने सामाजिक काम करण्यासाठी एनवाय फाउंडेशनची स्थापना केली असून त्या अंतर्गत देशभरात विविध सामाजिक कामं केली जातात.  या उपक्रमांमध्ये वंचितांना जेवण देणे, साथीच्या आजारादरम्यान लसीकरण शिबिरे, वैद्यकीय मदतीसाठी पैसे देणे, पंजाबमधील विधवांना शिक्षण आणि उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे यांचा समावेश आहे. एनवाय फाउंडेशनने रूरल रिलेशनच्या प्रदीप लोखंडे यांच्याशी करार केला आहे. 
 
ही बातमी वाचा :

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …