MEIL च्या समुह कंपनी ICOMM चा कॅराकल सोबत करार, युएईकडून भारताला होणार संरक्षण सामग्रीसाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण

अबूधाबी , युएई : भारताच्या संरक्षण उत्पादन वाढीच्या यशोगाथेत आयकॉम या  मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) च्या समूह कंपनीने मोठी झेप घेतली आहे. 21 फेब्रुवारी 2023 ला आयकॉमने युएईतील एज समुहाच्या कॅराकल सोबत संरक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच तंत्रज्ञान हस्तांतरण (ToT) साठी भागीदारी आणि परवाना करारावर स्वाक्षरी केली. करारानुसार, आयकॉम ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत भारतीय बाजारपेठेसाठी कॅराकलच्या लहान श्रेणीतल्या शस्त्रांस्त्राची स्थानिक पातळीवर निर्मिती करेल.
जगातील सर्वात मोठ्या संरक्षण प्रणाली प्रदर्शनांपैकी एक असलेल्या युएईतल्या अबुधाबी येथे IDEX 2023 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली.
 
आयकॉम कॅराकल लहान शस्त्रांस्त्रांची संपूर्ण श्रेणी तयार करेल, ज्यात प्रसिध्द कॅराकल EF पिस्तूल, आधुनिक सीएमपी 9 सबमशीन गन, CAR 814, CAR 816 आणि CAR 817 टॅक्टिकल रायफल, CAR 817 DMR टॅक्टिकल स्नायपर रायफल, CSR- 50   आणि CSR 338 आणि CSR 308 बोल्ट अॅक्शन स्नायपर रायफल आणि CSA 338 अर्ध-स्वयंचलित स्नायपर रायफल समाविष्ट आहेत. 

आयकॉमचे प्रमुख सुमंथ पी यांनी या प्रसंगी भारताचा संरक्षण उद्योग आपली सार्वभौम उत्पादन क्षमता विकसित करण्याच्या एका सुनियोजीत मार्गावर प्रगती करत आहे आणि  कॅराकल बरोबरचा हा करार संरक्षण क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेशी सुसंगत आहे असं सांगीतले. छोट्या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये प्रवेश हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :  Investigation : विद्येच्या मंदिरात पैशांचा बाजार, आरटीईच्या प्रवेशांवर धनदांडग्यांचा डल्ला

कॅराकलच्या लहान शस्त्रांची संपूर्ण श्रेणी ICOMM च्या हैदराबादमधील जागतिक दर्जाच्या डिझाइन, विकास आणि उत्पादन केंद्रामध्ये तयार केली जाईल. ICOMM ही क्षेपणास्त्रे आणि त्याच्या उप-प्रणाली तसेच संप्रेषण आणि EW प्रणाली, रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स, कंपोझिट, युद्धसामग्री, कमांड कंट्रोल सेंटर, यूएव्ही आणि अँटेना, सैन्याची सुरक्षीत आश्रयस्थाने, ड्रोन आणि काउंटर-ड्रोन प्रणाली तयार करणार्‍या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

कॅराकलचे CEO हमद अल अमेरी म्हणाले आम्ही ICOMM सोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत, अभियांत्रिकी आणि संरक्षण यासह अनेक क्षेत्रांमध्ये एंड-टू-एंड सोल्यूशन्स प्रदान करणाऱ्या  ICOMM क्षमता, CARACAL च्या प्रगत लहान शस्त्रांच्या पोर्टफोलिओला पूरक आहे.

ICOMM ही मेघा इंजिनीअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (MEIL) ची समूह कंपनी आहे. एमईआयएल उत्पादन डिझाइनिंग, अभियांत्रिकी, आणि क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे. संरक्षण आणि एरोस्पेस, उर्जा, रस्ते, तेल आणि वायू आणि दूरसंचार यासारख्या अनेक क्षेत्रात मेघा इंजिनीअरींग आपला ठसा उमटवला आहे. जागतिक स्तरावर कंपनीचे 20 पेक्षा जास्त देशात आपले अस्तित्व अधोरेखीत केले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …