IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

IMF Warns on Losing Jobs on Global Recession: सध्या सगळीकडे जागतिक मंदीचे वातावरण (Global Recession) असल्याने सगळ्याच देशांचे अर्थकारण बिघडले आहे. त्याचा फटाका मोठ्या प्रमाणात अमेरिका, चीन आणि युरोप या देशांना बसला आहे. देशांना फंड देणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) संशोधन विभागानं एक सविस्तर रिसर्च रिपोर्ट प्रसिद्ध केला असून या रिपोर्टमध्ये त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. वाढत्या महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभुमीवर आता जगात मोठ्या प्रमाणात यावर्षी मंदीचे महासंकट उद्भवणार आहे. याच पार्श्वभुमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा (Kristalina Georgieva) यांनी अख्ख्या जगाला जाहीर इशारा दिला आहे. यावर्षी प्रत्येक तीन माणसांच्या मागे एकाची नोकरी जाणार असल्याचा इशारा त्यांना दिला आहे. या मंदीचा फटका आता सर्वसामान्यांच्या नोकरीला बसणार आहे. (global recession will cause every third person to lose their job by 2023 Find out more here)

इशारा काय? 

तुम्ही नोकरदार असाल तर 2023 मध्ये तुमची नोकरी धोक्यात येणार आहे कारण 2023 मध्ये जगातल्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते. 2021 आणि 2022 पेक्षाही भयानक आर्थिक मंदीचा सामना 2023 मध्ये करावा लागू शकतो आणि कोट्यवधी लोकं बेरोजगार होऊ शकतात, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं (International Monetary Fund Report) म्हणणं आहे. 

हेही वाचा :  फायनली WhatsApp घेऊन आलं दमदार फीचर, सेंट झालेल्या मेसेजमध्येही बदल करता येणार

 

काय म्हटलं IMF नं? 

आयएमएफच्या म्हणण्यानुसार, या वर्षी सर्वात मोठ्या स्तरावर आपल्या सर्वानाच आर्थिक मंदीचा सामना करावा लागणार आहे. कोविडच्या वेळीच घसरलेल्या आर्थिक घडीपेक्षाही यंदा सर्वच देशांना मोठ्या प्रमाणात फटाका बसू शकतो. विकसनशील देशांना या जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. यात चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा एका न्यूज चॅनलच्या शोमध्ये यासंबंधीची महिती दिली. यात त्यांनी रशिया – युक्रेन युद्धामुळे (Ukraine Conflict) वाढलेली आर्थिक संकट यांवर प्रकाश टाकला, त्यासोबतच त्यांनी चीन आलेल्या ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटमुळे सुरू झालेल्या अडचणींबद्दलही सांगितले. जगातील एक तृतीयांश अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसणार आहे. 

प्रमुख कारणं काय? 

जगातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामागची कारणं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं काही कारणं स्पष्ट केली आहेत. यामुळे मंदीचा सर्वांच्या नोकरीवर परिणाम होणार आहे. त्यातून नोकरी तर धोक्यात आली आहेच पण त्याचसोबत पगारवाढही धोक्यात आली आहे. त्यातील ही तीन प्रमुख कारणं आहेत. 

रशिया-युक्रेन युद्ध त्यातून निर्माण झालेली महागाई त्यातून वाढलेले व्याजदर आणि यांचा बसलेला फटका सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला घातल ठरतो आहे. 15-39 वयोगटातील व्यक्तींना आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. अमेरिका, युरोप आणि चीनच्या (America, Europe and China) आर्थिक सुस्तीची झळ जगातील बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थांना बसणार आहे. 

हेही वाचा :  ईडापिडा टळो आणि....; कोरोनाला चिरडून पार पडली बगाड यात्रा, भाविकांचा उत्साह शिगेला

जगभरात नोकरकपातीची लाट आली असून गेल्या दोन महिन्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या या गेल्या आहेत. फेसबुक, ट्विटर, अॅमेझॉन अशा दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. जगाची आर्थिक वाढ ही 2021 मध्ये 6 टक्क्यांवरून 2022 मध्ये 3.2 टक्क्य़ांवर आली होती तीच आता 2023 मध्ये 2.7 टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …