Viral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक

Viral News : चित्रपटातून तर कधी पार्टीतून तुम्ही पटियाला पेगबद्दल ऐकले असालच. तुम्ही मद्यपान करता किंवा नाही तरी पटियाला पेग हे नाव नक्कीच कधी ना कधी कानावर पडलंच असेल. हे नाव कुठून आलं आणि या पेगला पटियाला पेग का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? पंजाब, दिल्ली, चदिगढ या शहरामध्ये हे नाव हमखास ऐकायला मिळतं. मद्यपान करणारे लोक म्हणतात की पटियाला पेग प्रत्येकालाच झेपतो असं नाही. कारण पटियाला पेगमधील अल्कोहोलचं प्रमाण लार्ज पेगपेक्षा अधिक असल्याने तो प्रत्येकाला झेपतो असं नाही. असा हा पटियाला पेगच्या नावाची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. 

पटियाला पेगची कथा काय आहे?  

एका रिपोर्टनुसार पटियाला पेगचा शोध पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांच्या दरबारात लागला होता, असं म्हणतात. सन 1900 ते 1938 या काळात तत्कालीन पटियाला संस्थानावर भूपिंदर सिंग यांनी राज्य केलं. भूपिंदर सिंग हे आधुनिक भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त व्यक्तींपैकी एक महाराजा असल्याचा उल्लेख आहे. परदेशी मान्यवर आणि खेळाडूंसाठी हा महाराजा अनेकदा भव्य पार्ट्याचं आयोजित करायचा. एवढंच नाही तर ते स्वतः एक खेळाडू असून त्यांनी 1911 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वही केलं असं इतिहासाकारक म्हणतात. 

हेही वाचा :  Dapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना 'इतक्या' मदतीची घोषणा

पटियाला पेगची सुरुवात कशी झाली?

इतिहासकारक म्हणतात की, महाराजांना मॅचमध्ये पराभव हा अजिबात आवडायचं नाही. त्यामुळे त्यांनी धोरणात्मक रणनिती आखली होती. या रणनितीनुसार मोठ्या सामन्याच्या आदल्या रात्री कर्मचाऱ्यांना सांगून पाहुण्या संघाला ते दुप्पट व्हिस्की देत होते. त्यांनी असं भाकीत केलं होतं की, आयरिश संघाचं सदस्य दुसऱ्या दिवशी सकाळी जड हँगओव्हरसह जागे होतील. त्यामुळे त्यांच्या खेळावर परिणाम होईल. मग काय महाराजाने जे ठरवलं तसंच घडलं आणि महाराजाने सामना जिंकला. मात्र, व्हाईसरॉयच्या टीमचे पोलिटिकल एजंट महाराजांकडे तक्रार करायला गेले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, होय, आमचं पेग पटियालामध्ये मोठे असतात. 

आणखी एक कथा 

पटियाला पेगची आणखी एक लोकप्रिय कथा अशी आहे की, महाराजांना त्यांच्या डॉक्टरांनी दिवसातून फक्त एक ग्लास मद्यपान करण्याचा सल्ला दिला होता. म्हणून महाराज मोठा पेग प्यायला लागले. अजून एक कथा आहे की महाराजांची उशिरा येण्याची प्रवृत्ती होती. त्यामुळे पाहुण्यांना मोठ्या पेग म्हणजे पटियाला पेग्स देण्यात येत होते. 

पटियाला पेग किती मोठा होता?

मिळालेल्या माहितीनुसार, एक पटियाला पेग अंदाजे 120 मिली व्हिस्की पेक्षा जास्त असतो. सुरुवातीला ‘पटियाला पेग’ फक्त शाही पाहुण्यांनाच दिला जायचा. झी24 तास मद्यपान करण्याचा विरोध करता. मात्र ही बातमी माहितीसाठी देण्यात आली आहे. 

हेही वाचा :  १०० व्या कसोटी सामन्यापूर्वी मिळालेल्या सन्मानावेळी विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना, “माझ्यासाठी हा खास क्षण”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On PM Modi Political Stand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीशी काहीच घेणे देणे नाही. …

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी …