शहनाज गिलच्या वडिलांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

मुंबई, 8 ऑक्टोबर-  ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचे वडील संतोक सिंग सुख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना विदेशातील एका नंबरवरुन फोन आला होता. या फोनवरुन अज्ञातांनी त्यांना दिवाळीच्या आधी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ब्यासमधून तरान्तरनकडे जाताना त्यांना हा फोन आला होता. त्यांनी शिव्या दिल्यानंतर अज्ञातांनी दिवाळी आधी घरात घुसून मारण्याची धमकी त्यांना दिली आहे. शहनाजचे वडील संतोक यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली आहे.

संतोक यांना जीवे मारण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही संतोक सिंग सुख यांना ठार मारण्याचा प्रयत्न झालेला आहे.2021मध्ये संतोक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. 25 डिसेंबरला त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला होता. यावेळी 2 व्यक्तींनी बाईकवरुन येत त्यांच्यावर गोळी झाडली होती. परंतु सुदैवाने संतोक यांना कोणतीही इजा झाली नव्हती. रिपोर्ट्सनुसार ही घटना अमृतसरमध्ये घडली होती. यावेळी संतोक एका कार्यक्रमानिमित्त निघाले होते. दरम्यान त्यांचा ड्रायव्हर एका ढाब्याजवळ कार थांबववून लघुशंकेसाठी गेला होता. त्यावेळी संतोक कारमध्ये एकटेच होते. आणि हीच वेळ साधत दोन व्यक्तींनी बाईकवरुन येत त्यांच्यावर गोळी झाडली होती. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या बॉडीगार्डने त्यांचा जीव वाचवला होता.
(हे वाचा:Arun Bali Death: 3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन;झाला होता दुर्मिळ आजार )
शहनाज आणि वडिलांच्या नात्यात चढ-उतार-
पंजाबी अभिनेत्री-गायिका शहनाज गिल आणि तिच्या वडिलांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत. परंतु बिग बॉसमध्ये आल्यानंतर वडील संतोक यांनी आपल्या लेकीला पाठिंबा दिला होता. पण त्यानंतर त्यांनी आपल्याच लेकीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली होती. एकवेळ अशी अली होती की शहनाजचे वडील तिच्यावर इतके नाराज झाले होते की त्यांनी आयुष्यात परत कधी शहनाजसोबत बोलणार नसल्याचं म्हटलं होतं.

माध्यमाशी संवाद साधताना शहनाज गिलच्या वडिलांनी म्हटलं होतं की, शहनाज एकदा शूटिंगसाठी चंदीगडला आली होती. परंतु ती घरी आम्हाला भेटायला आली नाही. शूटिंगच्या ठिकाणापासून आमचं घर फक्त २ तासांच्या अंतरावर होतं. तिने आम्हाला शूटिंगबाबत काहीच कल्पना दिली नसल्याचा दावाही त्यांनाही केला होता. आपल्याला नंतर मीडियावरुन समजलं की ती शूटिंगसाठी आलेली होती.

शहनाज गिलच्या कामाबाबत सांगायचं तर, ती लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ती अभिनेता सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

तेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री

मुंबई, 07 ऑक्टोबर : बिग बॉस हिंदी फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय …

चंद्रमुखी झाली सोनाबाई देशपांडे,अमृता खानविलकर पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत,लूक आला समोर

मुंबई : सुबोध भावेच्या हर हर महादेव सिनेमाची चर्चा खूप आहे. येत्या दिवाळीत हा सिनेमा …