मुंबई, 6 ऑक्टोबर- गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या झालेल्या अनेक बातम्या समोर येत आहेत. सर्व सामान्यच नव्हे तर मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांनीसुद्धा हे टोकाचं पाऊल उचलत सर्वांना धक्का दिला आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या आत्महत्येची केस पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीने हॉटेलच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली होती. या बातमीने हादरुन गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शकाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत सर्वांना हादरवून सोडलं आहे.
प्रसिद्ध तामिळ अभिनेता-दिग्दर्शक लोकेश राजेंद्रनने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. अवघ्या ३४ व्या वर्षी या टीव्ही अभिनेत्याने टोकाचं पाऊल उचललल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकेशने एक बालकलाकार इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. एक उत्तम अभिनेता-दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. या वृत्तानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लोकेश आणि पत्नीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Entertainment
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या