Breaking News

उधारीचे कपडे घेऊन बिग बॉसमध्ये गेली होती उर्फी जावेद; बॉयफ्रेंडबाबत केला खुलासा

मुंबई, 7 सप्टेंबर-   उर्फी जावेद आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने जवळपास सर्व प्रकारच्या हटके ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीचा हा बोल्ड आणि बिनधास्तपणा अनेकांना पसंत पडतो तर यामुळे अनेकजण तिच्यावर टीकादेखील करतात. परंतु यावेळी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.उर्फीने नुकतंच आपल्या खाजगी आयुष्याबाबत काही खुलासे केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी जावेदने एका मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्याबाबत सांगितलं. तिने तिच्या रिलेशनशिपबाबत आणि लग्नाच्या योजनांबद्दल चर्चा केली.उर्फीने आपण सिंगल असल्याचं सांगितलं आहे. उर्फी म्हणाली की ती कधीही रिलेशनशिपमध्ये असेल अशी तिला अपेक्षा नाही. खरंतर तिला तिचं अफेअर सार्वजनिक करायचं नाहीय.याबाबत बोलताना उर्फी जावेद म्हणाली, ‘तुम्ही मला कधी कोणत्या मुलासोबत पाहिलं आहे का? कधीही पाहू शकणार नाही. मी माझं नातं लोकांसमोर आणेन, ते शक्य वाटत नाही.’ लग्न झाल्यावरच हे शक्य होईल. याचं कारणही तिने स्पष्ट केलं. तिच्या मते तिला लोकांच्या नकारात्मकतेचा जितका सामना करावा लागतो, तितका तिच्या बॉयफ्रेंडला सहन करणं शक्य होणार नाही.

उर्फीने पुढे सांगितलं, ‘माझ्याजवळ खूप हिंमत आहे. म्हणून मी इतकं सहन करते.पण मी माझ्या जोडीदारासाठी अडचण का निर्माण करु ? माझ्यामुळे तो त्रस्त होईल. वास्तविक, तिच्या जोडीदारावर तिच्याशी संबंधित गोष्टींचा प्रभाव पडू नये असं तिला वाटत असतं. बिग बॉस ओटीटीमध्ये असताना ती रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा तिने केला होता. पारस कलनावतसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. ती म्हणते, ‘जर मी आज पारससोबत असते तर आज मी जी काही आहे ती नसते.’ उर्फीने सांगितलं की, तिला तिच्या आयुष्यात कोणाचंही नियंत्रण आवडत नाही.
(हे वाचा:Celebes Education: विदेशात जन्मलीय तेजस्वी प्रकाश; ‘या’ क्षेत्रात घेतलीय पदवी )
सोबतच उर्फीने आणखी एक खुलासा करत सांगितलं की, बिग बॉसच्या घरात तिने उधारीवर कपडे आणले होते. तिने या शोमध्ये जे कपडे परिधान केले होते. ते सर्व उधारीचे असल्याचे तिने सांगितलं आहे . आणि बिग बॉसच्या घरात ती केवळ एकच आठवडा राहिली होती. त्यामुळे तिला फारसं मानधन मिळालं नव्हतं. त्यामुळे बाहेर आल्यानंतर तिच्यावर कर्जाचं डोंगर झाल्याचं ती सांगते. शोमधून बाहेर पडल्यांनंतर आपण जिद्दीने पैसा कमावून कर्ज फेडल्याचं उर्फीने सांगितलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘परी म्हणून शेवटचा सीन शूट करण्याची वेळ…’; मायरा झाली भावूक; शेअर केला VIDEO

मुंबई,  06 सप्टेंबर : काय म्हणणं आहे?  किती पैसे कमावतो? असे प्रश्न विचारत प्रेक्षकांच्या समोर …

कोळिणींवर केलेल्या वक्तव्यावर वर्षा उसगांवकरांनी मागितली माफी, हात जोडून म्हणाल्या..

मुंबई- प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन मासे विकणाऱ्या एका अॅपसाठी जाहिरात केली …