दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात होणार तीन मोठे बदल, पाहा कोणाला मिळणार संधी…

रांची : भारतासाठी दुसरा वनडे सामना हा करो या मरो, असा असणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पहिला बदल….
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोई हा चांगलाच महागडा ठरला होता. रवीने आठ षटकांमध्ये तब्बल ६९ धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यासाठी संघाबाहेर ठेवण्यात येऊ शकते. रवीच्या जागी भारतीय संघात दाखल झालेल्या वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात येऊ शकते. दीपक चहर जायबंदी झाल्यावर भारतीय संघात सुंदरला संधी देण्याता आली होती. सुंदर हा फिरकीपटू तर आहेच, पण त्याचबरोबर तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे त्याला या सामन्यात संधी दिल्यावर भारताच्या फलंदाजीलाही बळकटी मिळू शकते.

दुसरा बदल….
पहिल्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज अवेश खान हा गोलंदाजीतही महागडा ठरला होता. त्याचबरोबर त्याने फलंदाजीला आल्यावर मोठ्या चुका केल्या आणि त्याचा मोटा फटका भारतीय संघाला बसला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी त्याला संघाबाहेर केले जाऊ शकते. अवेशच्या जागी भारतीय संघात आता कोणाला संधी मिळू शकते, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असेल.

तिसरा बदल…
भारतीय संघातील दीपक चहरला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला या वनडे मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघात कोणाला संधी द्यायची, याचा विचार भारतीय संघात सुरु झाला आहे. चहरच्या जागी यावेळी भारतीय संघात शाहबाज अहमदला संधी दिली जाऊ शकते.

खेळपट्टीचा अंदाज
पावसामुळे लखनौ एकदिवसीय सामना ४० षटकांचा खेळवण्यात आला होता आणि रविवारच्या अंदाजानुसार रांचीमध्येही पावसाची २० टक्के शक्यता आहे. जेएससीए स्टेडियमच्या खेळपट्टीवर सहसा धावा जास्त होतात, या ठिकाणी पाच पैकी तीन एकदिवसीय सामन्यांत २८० पेक्षा जास्त पहिल्या डावात धावा धावा झाल्या आहेत.

संभाव्य संघ
भारत : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई/शहबाज अहमद, आवेश खान, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), जेनेमन मालन, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल/अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी/मार्को जॅनसेन/अ‍ॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

पवार गटाच्या संदीप पाटलांकडून MCA अध्यक्षपदासाठी अर्ज, या दिवशी होणार निवडणूक

मुंबई, 9 ऑक्टोबर: मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक यंदा 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या …

भारताच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन, सामना उशिरा सुरु होणार का जाणून घ्या

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामना हा निर्णयाक ठरू शकतो. कारण …