पवार गटाकडून संदीप पाटील मैदानात
भारताचे माजी कसोटीवीर आणि 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य संदीप पाटील यांनी आज पवार गटाकडून अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. याशिवाय उपाध्यक्षपदासाठी नवीन शेट्टी तर सचिव पदासाठी अजिंक्य नाईक, संयुक्त सचिवपदासाठी गौरव पय्याडे तर खजिनदार पदासाठी जगदीश आचरेकर यांनीही आपले अर्ज भरले आहेत.
याआधी 1996 मध्ये संदीप पाटील ज्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते त्यावेळी ते एमसीएचे व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून विजयी झाले होते. यापूर्वी दिलीप वेंगसरकर आणि अजित वाडेकर यांनीही एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना निवडणूक जिंकता आली नव्हती.

हेही वाचा – Ind vs SA ODI: रांची वन डेत ‘या’ खेळाडूचा होणार डेब्यू? पाहा अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग XI…
क्रिकेट प्रशासनात खेळाडू
सध्या भारतीय क्रिकेट प्रशासनामध्ये मोठ्या पदावर मोजक्याच माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा समावेश होतो. दरम्यान संदीप पाटील यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर टीम इंडियाचं प्रशिक्षकपदही भूषवलं. त्यानंतर ते बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्षही होते. शिवाय नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या