अमिताभ यांचा ८० वा वाढदिवस खास बनवण्यासाठी फिल्म हेरिटेज फाऊंडेशनतर्फे चार दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बिग बींचे 11 क्लासिक चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. 8 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या दरम्यान देशभरातील 17 शहरांमध्ये 22 स्क्रीन्सवर बिग बींचे 11 सुपरहिट चित्रपट दाखवले जात आहेत. अमिताभ यांनी स्वतः ट्विट करत चाहत्यांना ही माहिती सांगितली आहे.
हेही वाचा – ‘या’ क्रिकेटपटूच्या सांगण्यावरून, अमिताभ बच्चन यांनी भारत-पाक सामन्यासाठी गायलं होतं राष्ट्रगीत
आपल्या ट्विटर हँडल आणि इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी लिहिले कि, ”पुन्हा एकदा सुरुवात… ज्या चित्रपटांपासून माझा सिनेमा प्रवास सुरू झाला… ‘डॉन’ आणि ‘मिली’ रिलीज होऊन जवळपास 50 वर्षे झाली आहेत… आता हे सिनेमी पुन्हा दाखवले जात आहेत..मोठ्या पडद्यावर आणखी क्लासिक पाहायला मिळतील आशा आहे.” यासोबतच त्यांनी एक पोस्टर देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये डॉन ते कुली आणि ‘अमर, अकबर, अँथनी’ मधील त्यांनी साकारलेल्या भूमिका पाहायला मिळत आहेत.
T 4434 – Back to the Beginning .. with the films from where my journey began in cinema .. Don and Mili nearly fifty years since they were released .. Now showing in Cinema .. Hoping to see more classics back on the big screen ..
@shividungarpur @Fhf_Official pic.twitter.com/I22yf8hlsq
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 8, 2022
चाहत्यांसोबतच चित्रपट कलाकारही या उपक्रमाचे आणि अमिताभचे कौतुक करत आहेत. एवढेच नाही तर अमिताभ यांच्या चित्रपटांशी संबंधित काही दुर्मिळ गोष्टींचे प्रदर्शनही मुंबईतील जुहू बीच येथील पीव्हीआर सिनेमात करण्यात आले आहे.अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला सुरुवात करणारे 11 क्लासिक चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. ही बातमी बिग बींच्या चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की 8 ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसापर्यंत त्यांचे आयकॉनिक चित्रपट पीव्हीआर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. हे 11 चित्रपट देशभरातील 17 शहरांमध्ये 22 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘गुडबाय’ चित्रपट 7 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या चित्रपटात बिग बींच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय चित्रपटात नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अविराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या