उर्फी जावेदची कॉपी करण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उर्फी सारखे कपडे आणि उर्फी जशी विधान करते अगदी तसंच त्यानं करण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडीओनं सध्या इंटरनेटचं वातावरण गरम केलंय. चक्क उर्फीनंही या व्हिडीओवरर कमेंट केली आहे. उर्फीनं म्हटलं की, ‘माय फॅशन नो क्वेशन’.
या व्हिडीओवर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ‘याच्यापुढे उर्फी पण फेल, दिल जीत लिया, कडक, उर्फीचा खूप मोठा फॅन आहे वाटतं, ये क्या बला है, मस्ता केलंय’, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. अनेकजण व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट होत आहेत.
दरम्यान, उर्फी तिच्या फॅशमुळे नेहमीच चर्चेत असते. बिग बॉस ओटीटी केल्यापासून ती तर मोठ्या प्रमाणावर प्रकाश झोतात आली. बोल्ड लुक, अतरंगी फॅशन यामुळे ती कायमच चर्चेचा विषय ठरते. कधी काच, प्लॅस्टिक, वर्तमानपत्र, ब्लेड, घड्याळ, वायर, खडे, फुलं, सगळ्याचं गोष्टींपासून उर्फीनं फॅशन आजमावली आहे. आणि प्रत्येक वेळी आणखी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न उर्फी करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या