बिग बॉसच्या चावडीचा प्रोमो समोर आला आहे ज्यात महेश मांजरेकर अपूर्वा आणि प्रसाद यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात केलेल्या राड्याची महेश मांजरेकर चांगलीच शाळा घेताना दिसणार आहेत. आज म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री 9.3 वाजता बिग बॉसची चावडी भरणार आहे.
हेही वाचा – BBM4: ‘माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईनेच…’; अक्षय केळकरने सांगितला ब्रेकअपचा तो किस्सा
रिलीज झालेल्या चावडीच्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर आठवड्याचा पाढा वाचून दाखवतात. त्यात घर का वाजलं हे सांगताना मांजरेकर अपूर्वावर चांगलाच निशाणा साधतात. मांजरेकर म्हणतात, “बिग बॉसचं घर आठवडाभर वाजलं ते फक्त अपूर्वा नेमळेकरमुळे वाजलं. तू सगळ्यांना सांगते आवाज खाली आवाज खाली. मुळात सर्वात जास्त ओरडत तूच होतीस”. मांजरेकरांच्या या वक्तव्यानंतर प्रसाद जवादे “मुळात प्रोब्लेम हाच आहे की…”, असं म्हणतो तेवढ्यात मांजरेकर “जवादे तुझी बाजू घेत नाहीये मी. मध्ये मध्ये तोंड खुपसायचं नाही”, असं म्हणत त्याला झापतात.
मांजरेकरांचा पहिल्याच आठवड्यातील रुद्र अवतार पाहून बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कसा असणार आहे याचा अंदाज आला आहे. अपूर्वा आणि प्रसाद शिवाय मांजरेकरांनी घरात आणखी कोणाची शाळा घेतलीये आणि कोणाचं कौतुक केलं आहे हे आजच्या चावडीवरच कळणार आहे.
चावडीचा पहिला प्रोमो पाहून प्रेक्षकांनी तुफान कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. ‘अब आयेगा मजा’ , ‘एकदम नादखुळा’, ‘आय लव्ह यू महेश सर’, ‘आज मज्जा येणार’, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या