Breaking News

नऊवारी साडीत घरातील मुलांनी धरला लावणीवर ठेका; नजरेतूनच केलं घायाळ

मुंबई, 6 ऑक्टोबर : “ALL IS WELL” म्हणत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घराचा दरवाजा उघडला. नुकतंच यंदाच्या सीझनचं पहिले साप्ताहिक कार्य “दे धडक – बेधडक” पहायला मिळालं. टास्कमध्ये सगळ्याचं सदस्यांचा गोंधळ उडाला. साप्ताहिक कार्याच्या पहिल्या उपकार्यामध्ये सदस्यांमध्ये सुरुवात होताच वादाची ठिणगी पडली. बिग बॉस यांच्या आदेशानंतर देखील सदस्यांमधील ओढाताण थांबली नाही. अशातच आज सदस्य आणखी एक टास्क करताना दिसणार आहे. या टास्कचं नाव आहे ‘चान्स पे डान्स’.

आज ‘चान्स पे डान्स’ टास्क रंगणार असून स्पर्धक आपल्या डान्सनं सगळ्यांनाच सरप्राईज देणार आहे. अशातच समोर येत आहे की या टास्कमध्ये घरातले मुलं लावणीवर डान्स करताना दिसणार आहे. आज होणाऱ्या भागातील लावणीवर डान्स करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये प्रसाद जवादे आणि अक्षय केळकर नववारी साडी नेसून लावणीवर डान्स करत असल्याचं दिसत आहे. त्यांचे हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आजच्या भागात मुलांची लावणी पहायला प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

आता कोण कोण काय डान्स करणार आणि कोणती टीम विजयी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या प्रसाद आणि अक्षयचा नववारी लुक प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यांच्या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

दरम्यान, 100 दिवस 16 सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कोणते प्रेक्षकांची मनं जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘Adipurush महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही’; राम कदमांचा आक्रमक पवित्रा

मुंबई, 6 ऑक्टोबर-  दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रटावरुन सोशल मीडियावर वाद निर्माण झाला …

साजिद खानच्या बिग बॉस एन्ट्रीवर उर्फीचा आक्षेप, म्हणाली…

मुंबई, 6 ऑक्टोबर : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ ला सुरु झाली …