एम्सशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा जास्त फरक पडला आहे. मात्र त्यांना अजूनही पूर्णपणे शुद्ध आलेली नाही ही एक चिंतेची बाब आहे. राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टपासून व्हेंटिलेटरवर आहेत. राजूला यापूर्वी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते, मात्र गुरुवारी पुन्हा एकदा त्यांना 100 डिग्री ताप आल्याने पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. सतत त्यांच्याबाबत विविध हेल्थ अपडेट समोर येत आहेत.
एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तज्ञ डॉक्टर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर उपचार करणारी टीम शक्य ती सर्व खबरदारी घेत असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे राजू यांचा ऑक्सिजन लेव्हल, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य आहेत.त्यांच्या जवळचे मित्र, कुटुंबीय आणि चाहते सतत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
(हे वाचा:VIDEO: युजवेंद्र चहलच्या पत्नीला झाली होती गंभीर दुखापत; शस्त्रक्रियेनंतर समोर आली हेल्थ अपडेट )
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदय विकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिममध्ये वर्कआउट करताना ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते.त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना तब्ब 15 दिवसानंतर शुद्ध आली होती. सध्या त्यांच्या प्रकृतीत सकारात्मक बदल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या