Principal Recruitment: महाविद्यालयांना प्राचार्य पद भरण्याची तंबी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रडावर आता प्राचार्यांची पदे न भरणारी महाविद्यालये आहेत. दहा ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांना प्राचार्य नियुक्तीची प्रशासनाने डेडलाइनच दिली असून, मुदतीत प्राचार्य पदावर नियुक्ती केली नाही, तर विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्जच स्वीकारले जाणार नाहीत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. प्राचार्यांशिवाय महाविद्यालये चालविणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.

पायाभूत सुविध, पात्र शिक्षकांची नेमणूक नसलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांच्या तपासणी प्रक्रियेसह आता प्राचार्य नसलेल्या महाविद्यालयांकडे प्रशासनाने मोर्चा वळवला आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या विशेष अधिकारातून महाविद्यालयांची तपासणी सुरू असून, यात सहा महाविद्यालयांवर अनेक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश बंदी, यासह दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता प्राचार्य नियुक्तीवरून महाविद्यालयांवर कारवाईची तयारी सुरू केली असल्याचे सांगण्यात येते.

Govt Job: पासपोर्ट ऑफिसमध्ये परीक्षा न देता मिळेल नोकरी, २ लाखांपेक्षा जास्त पगार
विद्यापीठाने बुधवारी प्राचार्य भरती न करणाऱ्या महाविद्यालयांना पत्राद्वारे प्राचार्य पद तात्काळ भरा, असे स्पष्ट केले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ४८०पेक्षा अधिक आहे. त्यापैकी अनुदानित वगळता इतर बहुतांश महाविद्यालयांकडे प्राचार्य पदे रिक्त किंवा प्रभारी नियुक्ती आहे. अनेक प्रभारी प्राचार्यांच्या नियुक्तीबाबतही गोंधळ आहे. त्यामुळे प्रशासनाने महाविद्यालयांना सविस्तर पत्र पाठवून नियमांनुसार प्राचार्य पदे भरण्याचे निर्देश दिले. सोबत नियमावलीही देण्यात आली आहे. दहा ऑगस्टपर्यंत भरावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

निवृत्त संवर्गातील अध्यापकांमधून प्राचार्य निवडीलाही मर्यादा
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये निवृत्त संवर्गातील अध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी नियुक्त करण्याची पद्धत होती; परंतु, २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षापासून निवृत्त संवर्गातील अध्यापकांची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी एक वर्षासाठी नियुक्ती करता येणार नाही. यासह अभ्यासक्रमाच्या कार्यभारानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी अध्यापक, शारिरीक शिक्षण निर्देशक, ग्रंथपाल पदे पुर्णवेळ भरणे आवश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र अध्यापक यांसह नॅक मूल्यांकन, पुनर्मुल्यांकन करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Professor Recruitment:राज्यातील प्राध्यापक भरतीसंदर्भात महाविद्यालयांना सूचना
MPSC Recruitment:आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

TISS Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

TISS Recruitment: मुंबईतील टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (Tata Institute of Social Sciences, TISS) ही …

BMC Job: टीएन मेडीकल कॉलेजमध्ये भरती, चांगल्या पगारासोबत मुंबईत नोकरीची संधी

BMC Recruitment: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal …