पंतप्रधान मोदींचा राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना फोन

मुंबई, 12 ऑगस्ट: कॉमेडीय राजू श्रीवास्तव यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  रुग्णालयात दाखल केल्यापासून राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत कोणताही सुधारणा नसल्याचं समोर आलं आहे. त्यांची एन्जीओग्राफी देखील करण्यात आली मात्र दोन दिवसांपासून त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिलेला नाही. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सगळेच चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची  चौकशी करुन त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही श्रीवास्तव कुटुंबियांना फोन करुन चौकशी केली.

श्रेया श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शिखा श्रीवास्तव यांना फोन केला होता. त्यांनी राजू यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना योग्य ते उपचार देण्यासाठीची पूर्ण व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं आहे.

हेही वाचा – Raju shrivastav Health Update: राजू यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही
भाजप नेते जेपी नड्डा यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांना फोन करुन त्यांची विचारपूस केली.  तसेच भाजप नेते महामंत्री सुनिल बंसल देखील राजू श्रीवास्तव यांना पाहण्यासाठी एम्स रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात त्यांनी श्रीवास्तव यांच्या पत्नीची आणि नातेवाईकांची भेट घेतली.

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा भाचा रजत श्रीवास्तव यांनी दिली होती.  त्यांनी म्हटलं होतं की, कालपेक्षा आज राजू यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे.  दरम्यान गुरुवारी आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, असं म्हटलं गेलं आहे की,  राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यापासून ते बेशुद्ध आहेत. त्यांना कार्डियक अरेस्ट अटॅक आला होता. त्यांच्यावर सध्या ICU मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची स्पेशल टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.  राजू श्रीवास्तव लवकरात लवकर शुद्धीवर यावेत यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी सीरियलचा पॅटर्न OUT OF THE BOX होतोय?’; अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई,  24 सप्टेंबर :  टेलिव्हिजनवर मोठ्या संख्येनं मालिका पाहिल्या जातात. प्रत्येक घरात संध्याकाळी मराठी मालिकांचा …

कंगनाला मिळणार मथुरेचं तिकिट? हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मग राखी सावंतलाही…

मुंबई,  24 सप्टेंबर: सध्या देशाच्या राजकारणार 2024मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. …