माफी मागूनही आमिरचं नशीब खराब; Laal Singh Chaddha चे तब्बल 1300 शो रद्द

मुंबई 12 ऑगस्ट: आमिर खानची मूखु भूमिका असलेला लाल सिंग चड्ढा हा सिनेमा नुकताच प्रेक्षागृहात रिलीज झाला आहे. सिनेमावर बहिष्कार टाकण्याची जबरदस्त मागणी येत असताना आमिर स्वतः प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्यासाठी अपार कष्ट घेताना दिसत होता. मात्र सिनेमा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करताना दिसून आलेला नाही अशी माहिती मिळत आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाच्या अयशस्वी कामगिरीनंतर सिनेमाचे तब्बल 1300 शो कॅन्सल झाल्याचं सुद्धा समोर आलं आहे.
लाल सिंग चड्ढा सह रिलिज झालेल्या अक्षय कुमारच्या रक्षाबंधन सिनेमाची अवस्था सुद्धा काहीशी अशीच झाली आहे. दोन्ही सिनेमाने रिलीजच्याच दिवशी अपेक्षित कामगिरी न केल्याने त्यांच्या शोच्या संख्येत घट करण्यात आली आहे. लाल सिंग चड्ढाचे तर 1200 हुन अधिक शो कमी केल्याचं समोर आलं आहे
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार या दोन्ही सिनेमाचे जवळपास 10000 शो संपूर्ण भारतात लावण्यात आले होते. मात्र दोन्ही सिनेमे सिनेमागृहात प्रेक्षकांना खेचून आणायला अपयशी ठरले आहेत. रिपोर्टनुसार लाल सिंग चड्ढाच्या काही शोसाठी तुरळक गर्दी दिसून आली. (aamir khan laal singh chaddha film) आमिरच्या या सिनेमाला अक्षरशः 10-12 च प्रेक्षकांनी हजेरी लावल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे पुढील शोची संख्या कमी करण्यात आली.
हे ही वाचा- Laal Singh Chaddha विरोधात कोल्हापूरात भाजप, हिंदुत्त्वादी संघटना आक्रमक; सिनेमाच्या पोस्टरवर शाईफेक
आमिरच्या या सिनेमाला धरून गेले अनेक दिवस मोठा वाद सुरु आहे. आमिर खानने अनेक वर्षांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तवायामुळे त्याच्या सिनेमाला बॉयकॉट करण्यात यावं अशी मागणी केली जात होती. मात्र आमिरने अनेक मुलाखतींमध्ये देशावर असलेल्या प्रेमाची सफाई देत भावना दुखावल्या गेल्यांची वारंवार माफी सुद्धा मागितली. असं होऊनही सिनेमाला कोणतीच माफी किंवा कोणतंही म्हणणं वाचवू शकलं नसल्याचं दिसून आलं आहे.

सध्या आमिर खानच्या या सिनेमामुळे वातावरण पेटल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी सिनेमावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे तर कोल्हापुरात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केल्याचं सुद्धा समोर आलं आहे.

Published by:Rasika Nanal

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘भावा ही तुझ्यासाठी “गोष्ट छोटी” असेल पण…असं का म्हणाला आपला सिद्धू

मुंबई,  24 सप्टेंबर : अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सिद्धार्थला आता सगळेच …

नेहा कक्करवर केस करणार फाल्गुनी पाठक? काय आहे हे प्रकरण?

मुंबई, 24 सप्टेंबर : सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह सुरू आहे. सर्वत्र नवरात्रीची गाणी वाजण्यास सुरूवात …